

-rat१३p५.jpg-
OP26O63622
रत्नागिरी ः आर. एच. पी. फाउंडेशनतर्फे दिव्यांग व्यक्तींना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
----
‘आरएचपी’चा दिव्यांगांना आधार
साधनांचे वाटप ; स्वावलंबनासाठी मदतीचा हात
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १४ ः दिव्यांग व्यक्तींना दैनंदिन जीवनात अधिक सक्षम, आत्मनिर्भर आणि स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने ‘आर एच पी फाउंडेशन’ तर्फे विविध दिव्यांग व्यक्तींना आवश्यक सहाय्यक साधनांचे नुकतेच वाटप करण्यात आले.
फाऊंडेशनच्या या उपक्रमांतर्गत गरजांनुसार तुळसणी (संगमेश्वर) येथील शकिरा कुरेशी (पोलिओ) यांना वॉकिंग स्टिक, शांताराम लाड (हिमोफिलिया) यांना कुबड्या, साखरपा येथील शर्मिला चव्हाण (पोलिओ) यांना वॉकिंग स्टिक, देवळे येथील गौरी काळोखे (पोलिओ) यांना वॉकिंग स्टिक, तर उद्यमनगर (रत्नागिरी) येथील सलीम हाजू (अस्थिव्यंग) यांना व्हीलचेअर प्रदान करण्यात आली. सलीम हाजू यांचा एक पाय ढोपरापासून तर दुसऱ्या पायाची तीन बोटे कट झालेली आहेत. लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, रत्नागिरी येथील निवृत्त अधिकारी मनाली मिलिंद देसाई यांनी दिव्यांग व्यक्तींना मदत करण्याची इच्छा आरएचपी फाउंडेशनचे समीर नाकाडे यांच्याकडे व्यक्त केली होती. त्यानंतर समीर नाकाडे यांनी गरजू दिव्यांगांना आवश्यक असलेल्या साधनांची माहिती दिली आणि देसाई मॅडम यांच्या मोलाच्या सहकार्यातून ही सर्व साधने उपलब्ध करून देण्यात आली. या प्रसंगी फाउंडेशनचे अध्यक्ष सादिक नाकाडे, समीर नाकाडे यांच्यासह सर्व लाभार्थी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.