

- rat१४p७.jpg-
P26O63827
रत्नागिरी ः दक्षिण जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकील उपस्थित ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी व सदस्य
---
ठाकरे शिवसेना मजबूत करा
दत्ता कदम ः पक्षाची भूमिका जनतेपर्यंत पोहोचवा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १४ ः आगामी काळात बूथस्तरापर्यंत ठाकरे शिवसेना अधिक मजबूत करणे आणि पक्षाची भूमिका तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन जिल्हाप्रमुख दत्ता कदम यांनी केले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या रत्नागिरी (दक्षिण) जिल्हा कार्यकारिणीची बैठक माजी खासदार विनायक राऊत यांच्या संपर्क कार्यालयात जिल्हाप्रमुख दत्ता कदम यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात झाली. या बैठकीत विशेष मतदार नोंदणी (एसआयआर) कार्यक्रम, मतदार यादी पडताळणी आणि पक्ष संघटन बळकटीवर भर देण्यात आला. मतदार यादी पडताळणी मोहिमेअंतर्गत जाहीर झालेल्या प्रारूप मतदार यादीची सखोल तपासणी करणे आणि वगळण्यात आलेल्या नावांची पडताळणी करून तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश सर्व तालुकाप्रमुखांना देण्यात आले. या बैठकीस जिल्हा संघटक संजय पुनसकर, विधानसभा क्षेत्र प्रमुख बाळा कदम, शिवसहकार सेना जिल्हा संघटक चंद्रकांत शिंदे, तालुकाप्रमुख मयुरेश्वर पाटील, युवराज हांदे, नंददीप बोरुरकर, बळीराम गुजर, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, माजी युवासेना जिल्हाधिकारी प्रसाद सावंत, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख सचिन चोरगे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.