

- rat१४p९.jpg-
26O63851
रत्नागिरी ः जगद्गुरू श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रेरणेतून नागपूर येथून निघालेली पायी दिंडी.
----
पायी दिंडी नागपूरहून नाणिजकडे मार्गस्थ
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १४ ः जगद्गुरू श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने पर्यावरण संवर्धनाचा महामंत्र घेऊन ‘वसुंधरा पायी दिंडी’ नाणीजधामच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे. पूर्व विदर्भ पीठ, नागपूर यांच्या वतीने आयोजित ही दिंडी ११ सप्टेंबर रोजी कामठी तालुक्यातील नेरला येथील पीठावरून बाहेर पडली. सिद्ध पादुकांच्या पावन सान्निध्यात हजारो धामयात्री या पर्यावरण जागृतीच्या महायात्रेत सहभागी झाले आहेत.
नागपूर ते नाणीजधाम असा एक हजारहून अधिक किलोमीटरचा प्रवास ही दिंडी सुमारे ४० दिवसांत पूर्ण करणार आहे. दररोज सुमारे २० ते २५ किलोमीटरचे अंतर पार करीत दिंडी विविध गावांमधून पुढे मार्गक्रमण करणार आहे. २१ ऑक्टोबर रोजी नाणीजधाम येथे जगद्गुरू श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित वारी उत्सवात या दिंडीचे आगमन होणार आहे. या पायी दिंडीच्या मार्गावरील गावांमध्ये ग्रामस्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि प्रत्यक्ष वृक्षारोपण या त्रिसूत्रीवर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. धामयात्रींच्या सहभागातून वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, स्वच्छता आणि निसर्गाप्रती कृतज्ञतेचा संदेश जनमानसात रुजविण्यात येणार आहे. नागपूरच्या पूर्व विदर्भ पीठासह तेलंगणा, मराठवाडा, मुंबई, नाशिक, पुणे आणि गोवा येथूनही वसुंधरा पायी दिंड्या टप्प्याटप्प्याने नाणीजधामच्या दिशेने मार्गस्थ होणार आहेत. विविध प्रदेशांतून निघणाऱ्या या दिंड्यांच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश व्यापक जनचळवळीचे स्वरूप धारण करीत आहे. दिंडीत सहभागी होणाऱ्या धामयात्रींच्या आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी वैद्यकीय पथक, सुरक्षा पथक तसेच आवश्यक सेवा-सुविधांची नियोजनबद्ध व्यवस्था केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.