परतीसाठी 2 हजार लालपरीचे आरक्षण फुल्ल

परतीसाठी 2 हजार लालपरीचे आरक्षण फुल्ल
Published on

चाकरमान्यांच्या परतीची लगबग

अडीच हजार बसेस मुंबईकडे होणार रवाना

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १५ : गणेशोत्सवासाठी लाखोंच्या संख्येने चाकरमानी मुंबईहून रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. मोठ्या उत्साहात भक्तीमय वातावरणात वाजतगाजत लाडक्या गणरायाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. दरम्यान, गणेशोत्सवानंतर परतीच्या प्रवासासाठी रत्नागिरी विभागातून दोन हजार पाचशे एसटी बसेसचे नियोजन केले असून, आतापर्यंत दोन हजार बसेसचे आरक्षण फुल्ल झाले आहे. त्यामुळे ज्या गणेशभक्तांनी तिकीट काढले नाही त्यांनी तातडीने ऑनलाईन तिकीट काढावे, असे आवाहन एसटी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
गणेशोत्सवात प्रत्येक कोकणकर आपल्या मूळगावी नक्की येतो. यंदाचा गणेशोत्सव १२ दिवसांचा असणार आहे. तीन दिवसात तब्बल तीन हजार एसटी बसेसने लाखोंच्या संख्येने चाकरमानी रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. वर्षभर बंद असलेली घरे कोकणकरांनी उघडली असून, गर्दीने गावे गजबजली आहेत. दरम्यान, लाडक्या गणरायाला निरोप दिल्यानंतर चाकरमान्यांना मुंबई, पुणेसह अन्य ठिकाणी जाण्यासाठी परतीचे वेध लागत असतात. त्यामुळे चाकरमान्यांचा प्रवास चांगला, सुखकर होण्यासाठी रत्नागिरी विभागाच्यावतीने दोन हजार पाचशे एसटी बसेसचे नियोजन केले आहे.
मागील २० दिवसांपूर्वीच एसटी बसेसचे आरक्षण खुले केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला असून, आतापर्यंत दोन हजार एसटी बसेस बुक झाल्या असून, त्यापैकी ८०० बसेस ग्रुप बुकिंगच्या आहेत. आणखी काहीच बसेस शिल्लक असून, लवकरात लवकर प्रवाशांनी तिकीट बुकिंग करावे असे आवाहन एसटी विभागाच्यावतीने करण्यात आले.
---
महिला, ज्येष्ठ नागरिकांना सवलत
गणेशोत्सवात यंदाच्या वर्षी महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलत असणार आहे. महिला, ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना तिकिटात ५० टक्के सवलत, ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के सवलत असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com