प्रयोगशाळेत सुरक्षा पद्धती आवश्यक

प्रयोगशाळेत सुरक्षा पद्धती आवश्यक
Published on

प्रयोगशाळेत सुरक्षापद्धती आवश्यक
संजय महामुने : मंडणगडमध्ये ऑनलाइन कार्यशाळा
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. १६ : रासायनिक जळजळ, विषारी वायू, आग, शारीरिक दुखापती तसेच रासायनिक गळती व स्फोटांचे धोके टाळण्यासाठी प्रयोगशाळेत सुरक्षानियमांचे काटेकोर पालन आवश्यक आहे, असे महाड येथील ईएचएस प्लास्टिक कंपनीचे व्यवस्थापक संजय महामुने यांनी सांगितले.
सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि दोशी-वकील महाविद्यालय, गोरेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘प्रयोगशाळा व्यवस्थापन व सुरक्षा’ या विषयावरील ऑनलाइन कार्यशाळेत ते बोलत होते. या वेळी दोशी-वकील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जनार्धन होटकर उपस्थित होते. महामुने यांनी प्रयोगशाळेत सुरक्षित कामकाजाचे वातावरण राखण्यासाठी विविध सुरक्षापद्धतींची आवश्यकता असल्याचे सांगितले. योग्य सुरक्षा कार्यपद्धतीमुळे जबाबदार प्रयोगशाळा संस्कृतीला प्रोत्साहन मिळते. सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केल्यास विद्यार्थी व संशोधक आत्मविश्वासाने आणि कार्यक्षमतेने प्रयोग करू शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
या वेळी प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर, रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. मुकेश कदम, प्रा. संदीप निर्वाण, प्रा. शरिफ काझी, डॉ. विभुते, डॉ. नागोरे, डॉ. ठाकूर, प्रयोगशाळा सहाय्यक रंजीत म्हाप्रळकर आदी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. होटकर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. अमोल घोटी यांनी सूत्रसंचालन तर प्रा. संदीप निर्वाण यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com