

खेर्डीत तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १६ ः ‘खेर्डीचा राजा’ विठ्ठलावाडी गणेश मित्रमंडळ, खेर्डी-चिपळूण यांच्यावतीने स्व. नेहा अजित दाभोळकर यांच्या स्मरणार्थ चिपळूण तालुकास्तरीय शालेय व खुली बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा २० सप्टेंबर रोजी खेर्डी-विठ्ठलवाडी येथे दशरथ दाभोळकर यांच्या घरासमोरील पटांगणात होणार आहे.
ही स्पर्धा स्विस लीग पद्धतीने खेळवण्यात येणार असून, टाइम कंट्रोल १० मिनिटे असेल तर प्रत्येक चालीसाठी पाच सेकंद इन्क्रिमेंट राहील. या स्पर्धेसाठी तांत्रिक सहकार्य रश्मी सावर्डेकर यांचे लाभणार आहे. या स्पर्धेत पहिली ते सातवी, आठवी ते दहावी आणि खुला अशा तीन गटांचा समावेश आहे. पहिली ते सातवी गटातील विजेत्यांना अनुक्रमे १००१, ७०१, ५०१, ३०१ आणि २०१ रुपये, तर आठवी ते दहावी गटातील विजेत्यांना अनुक्रमे १५०१, १००१, ७०१, ५०१ आणि ३०१ रुपये अशी रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. खुल्या गटातील प्रथम पाच क्रमांकांसाठी अनुक्रमे २५०१, १५०१, १००१, ७०१ आणि ५०१ रुपये रोख पारितोषिके आहेत. सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धकांनी सकाळी ९.३० वाजता स्पर्धास्थळी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या स्पर्धेत प्रथम नावनोंदणी करणाऱ्या १२० स्पर्धकांनाच प्रवेश दिला जाणार असून, नोंदणीची अंतिम मुदत १९ सप्टेंबर आहे. अधिक माहितीसाठी प्रवीण सावर्डेकर आणि शशांक भिंगारे यांच्याशी संपर्क साधावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.