रीलमधून गावाची सफर

रीलमधून गावाची सफर
Published on

rat१६p५.jpg-
26O64275
रत्नागिरी ः रील स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला उपस्थित मान्यवर.
---
रील स्पर्धेत आदित्य कोत्रे प्रथम
हातखंबा लायन्स क्लब; ग्रामीण पर्यटनाला चालना
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १६ : गावची माती, संस्कृती, परंपरा आणि निसर्गसौंदर्य रीलच्या माध्यमातून जगासमोर आणण्यासाठी लायन्स क्लब ऑफ हातखंबा रॉयल, डीके फोटो स्टुडिओ आणि दर्जा चॅनल यांच्यातर्फे तालुकास्तरीय रील स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये कापडगाव येथील आदित्य कोत्रे यांनी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला तर गोळपचे सुतेज भाटकर द्वितीय आणि केळ्ये-भीमउद्यानचे राजदीप कदम तृतीय ठरले.
जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त आयोजित या स्पर्धेत रत्नागिरी तालुक्यातील २७ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. ग्रामीण जीवनशैली, राहणीमान, परंपरा, धार्मिक स्थळे, प्राचीन शिल्पे, खाद्यसंस्कृती, नद्या-नाले, धबधबे, पारंपरिक शेती व व्यवसाय यांसह गावातील वैशिष्ट्ये अवघ्या एक मिनिट ३० सेकंदांच्या रीलमधून प्रभावीपणे मांडण्याचे आव्हान स्पर्धकांसमोर होते. झरेवाडीचे ऋत्विक गोताड आणि हातखंब्याचे यश सनगरे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. बक्षीस वितरण सोहळ्यात रत्नागिरीचे प्रसिद्ध अभिनेते सचिन काळे यांनी ग्रामीण जीवनाशी नाळ जोडलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. लायन्स क्लबचे झोन चेअरमन एमजेएफ शिल्पा पानवलकर यांनी या नावीन्यपूर्ण सेवा उपक्रमाचे कौतुक केले. क्लबचे अध्यक्ष गिरीश शितप यांनी ग्रामीण पर्यटनाला चालना देणे आणि गावातील वैशिष्ट्ये डिजिटल माध्यमातून जगासमोर आणणे, हा स्पर्धेमागील उद्देश असल्याचे सांगितले.
पारितोषिक वितरणावेळी पंचायत समिती सदस्य संयोग उर्फ दादा दळी, पराग पानवलकर, ज्ञानेश कांबळे, भूषण बागुल, औदुंबर कळंबटे, राजेश गोसावी, वसंत कळंबटे यांच्यासह क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते. सचिन सावेकर यांनी सूत्रसंचालन केले तर अवधूत कळंबटे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com