

भरती परीक्षांसाठी सूचना मागविल्या
उच्चस्तरीय समितीचा २९ला कोकण दौरा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १६ ः भरती प्रक्रियेत सुधारणा घडवून आणण्याच्यादृष्टीने ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वपूर्ण असून, कोकण विभागातील सर्व स्पर्धा परीक्षा परीक्षार्थी, विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ आणि सुजाण नागरिकांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या महत्त्वपूर्ण सूचना सादर कराव्यात, असे प्रशासनातर्फे केले आहे.
राज्यातील विविध भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने गठित केलेली उच्चस्तरीय समिती कोकण विभागाच्या दौऱ्यावर येत आहे. समितीचे अध्यक्ष व सदस्य २९ रोजी वांद्रे (पूर्व) चेतना कॉलेज येथे भेट देणार आहेत. या पार्श्वभूमीवर कोकण विभागातील विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा परीक्षार्थी, पालक, शैक्षणिक संस्था व तज्ज्ञांकडून सुधारणांबाबत लेखी सूचना, अभिप्राय व निवेदने मागवण्यात आली आहेत. शासनामार्फत घेण्यात येणाऱ्या भरती परीक्षांची पद्धत अधिक गतिमान व त्रुटीमुक्त व्हावी यासाठी या उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. कोकण विभागातील संबंधित घटकांना समितीसमोर आपले म्हणणे, सूचना मांडता याव्यात यासाठी २९ सप्टेंबर रोजी चेतना कॉलेज जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांच्या कार्यालयाजवळील चेतना महाविद्यालय मार्ग येथे बैठक आयोजित केली आहे. समितीच्या भेटीदरम्यान प्रत्यक्ष भेटून चर्चा करण्यासाठी वेळ मागणे अथवा आपले लेखी निवेदन सादर करण्यासाठी १५ ते २३ सप्टेंबर हा कालावधी निश्चित केला आहे. अप्पर जिल्हा उपजिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात सकाळी ११ ते सायंकाळी ५:३० या वेळेत निवेदन देता येईल. अभिप्राय konkan_examreformstaskforce@maharashtra.gov.in या ई-मेलवर अर्ज पाठवू शकतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.