चिपळूण ः 12 सार्वजनिक गणेशोत्सव

चिपळूण ः 12 सार्वजनिक गणेशोत्सव
Published on

चिपळुणात १२ सार्वजनिक गणेशोत्सव
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १७ ः चिपळूण शहरात सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा रुजत असून, विविध भागात सार्वजनिक गणेशोत्सव साजरे केले जात आहेत. त्यामुळे गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता स्थानिक सांस्कृतिक आणि सामाजिक एकोप्याचे केंद्र बनलेला आहे. चिपळूण शहर व परिसरात १२ प्रमुख सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे लक्ष वेधून घेतात.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ खेर्डीचा राजा–पिटलेवाडी, सार्वजनिक गणेश मंडळ खेर्डी बाजारपेठ, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ खेर्डी वरचीपेठ, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म. रा. वि. वि. चिपळूण, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ माधव सभागृह, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ नगरपालिका चिपळूण, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कर्वे भाजीमंडई, सार्वजनिक गणेश मंडळ राहुल गार्डन-काविळतळी, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कोकणचा राजा-बहादूरशेखनाका, चिपळूणचा महाराजा गणेशोत्सव मंडळ-वडनाका आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ चिपळूणचा राजा-मार्कंडी यांचा समावेश आहे. याशिवाय शहरातील ऐतिहासिक श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ चिपळूण याचीही स्वतंत्र ओळख आहे. पूर्वी मंडळांची ओळख प्रामुख्याने परिसराच्या नावाने होत असे. आता आकर्षक नामकरण, देखावे, विद्युत रोषणाई आणि सामाजिक उपक्रमांमुळे प्रत्येक मंडळ आपली स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता स्थानिक सांस्कृतिक आणि सामाजिक एकोप्याचे केंद्र बनत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com