

- rat१७p१४.jpg-
26O64519
संगमेश्वर ः माभळे-जाधववाडीतील येथे साकारलेला अनोखा देखावा.
---
‘माभळे’त साकारले ‘समुद्रमंथन’
पौराणिक देखाव्याने भक्तांचे वेधले लक्ष
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १७ ः श्री गणरायाच्या उत्सवात भक्ती आणि पौराणिक संस्कृतीचा अद्भुत संगम साधत माभळे-जाधववाडी येथील कलाकार दुर्वेश गिते यांनी ‘समुद्रमंथन’ या प्रसिद्ध पुराणकथेवर आधारित आकर्षक देखावा साकारला आहे. त्यांच्या या देखाव्याने परिसरातील गणेशभक्तांचे आणि नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे.
पौराणिक कथेचे सादरीकरण केलेल्या या देखाव्यात देव आणि दानवांनी मिळून केलेले समुद्रमंथन, वासुकी नाग, मंदार पर्वत आणि भगवान विष्णूंचा ‘कूर्म अवतार’ यांचे अत्यंत सुंदर व सुबक दर्शन घडवण्यात आले आहे. समुद्रमंथनातून प्राप्त झालेल्या अमरापूरक अमृताचे रक्षण करण्यासाठी आणि ते देवांना मिळवून देण्यासाठी भगवान विष्णूंनी धारण केलेले ‘मोहिनी’ अवतार रूप आणि त्यातून देवांना झालेले अमृतपान, हा प्रसंग अतिशय प्रभावी प्रकाशयोजना व मूर्तीरचनेच्या माध्यमातून साकारण्यात आला आहे. विविध प्रसंगांची योग्य क्रमाने केलेली मांडणी, मनमोहक रंगसंगती आणि गणेशमूर्तीची आकर्षक रचना यामुळे देखाव्यातील जिवंतपणा अधिकच वाढला आहे. गिते हे दरवर्षी गणेशोत्सवाचे औचित्य साधून स्वतःच्या कल्पकतेतून काहीतरी नवीन, वेगळे आणि प्रबोधनात्मक साकारण्याचा प्रयत्न करत असतात. यंदाचा ‘समुद्रमंथन’ देखावा साकारताना दुर्वेश यांना त्यांच्या मित्रपरिवाराचे मोलाचे सहकार्य आणि प्रोत्साहन लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.