दिपराज आणि तीर्थाला सुवर्णपदक

दिपराज आणि तीर्थाला सुवर्णपदक
Published on

rat18p15.jpg-
64765
दिपराज खानविलकर आणि तीर्था यादव

जिल्हास्तरीय तायक्वॉंदो स्पर्धेत
दिपराज, तीर्थाला सुवर्णपदक
लांजा, ता. १८ ः जिल्हास्तरीय शालेय तायक्वॉंदो स्पर्धेत लांजा येथील न्यू इंग्लिश स्कूलचा दिपराज खानविलकर आणि डी. जे. सामंत स्कूलची तीर्था यादव यांनी सुवर्णपदक पटकावले. दोन्ही खेळाडूंची निवड कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी झाली आहे.
जिल्हास्तरीय स्पर्धेत लांजा तालुक्यातून ३० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. प्रतिस्पर्ध्यांवर तांत्रिक कौशल्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर मात करत दिपराज आणि तीर्थाने हे यश संपादन केले. दिपराज युवराज खानविलकर हा न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये ११ वीत तर तीर्था गणेश यादव डी. जे. सामंत स्कूल, लांजा येथे शिक्षण घेत आहे.
दोन्ही खेळाडूंनी चांगली कामगिरी करीत सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेत लांजाच्या राष्ट्रीय पंच शितल विरेंद्र आचरेकर यांनी पंच म्हणून यशस्वी जबाबदारी पार पाडली. या खेळाडूंचा तायक्वॉंदो फिटनेस अकॅडमी व गुरुकुल तायक्वॉंदो अकॅडमी, लांजा यांच्या वतीने खेळाडूंचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्ष किशोर यादव, उपाध्यक्ष अमोल रेडिज, सचिव व राष्ट्रीय पंच तेजस्विनी आचरेकर, सहसचिव अनुजा कांबळे, सदस्य रोहित कांबळे आणि लक्ष्मण करारा यांनी दोन्ही खेळाडूंचे कौतुक केले. या दोन्ही खेळाडूंचे राष्ट्रीय पंच तेजस पावसकर, गौरव खेडेकर, गणेश तोंडारे, तेजस वडवलकर व स्वरूप शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com