कौंढर ताम्हाणेत एक एकरात फुलला झेंडूचा मळा

कौंढर ताम्हाणेत एक एकरात फुलला झेंडूचा मळा
Published on

rat२०p२०.jpg
26O65243
चिपळूण ः वरपे दांपत्यानी कौंढर ताम्हाणे येथे साकारलेला झेंडूचा मळा.
---
कौंढर ताम्हाणेत एक एकरात फुलला झेंडूचा मळा

वरपे दाम्पत्याचा यशस्वी प्रयोग ; गणेशोत्सवात विक्री

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २१ : तालुक्यातील कळवंडे गावातील तरुण शेतकरी दांपत्याने झेंडू फुलांच्या शेतीचा प्रयोग साकारला आहे. दुचाकी मेकॅनिक योगेश वरपे आणि त्यांच्या पत्नी रेवती वरपे यांनी कौंढर ताम्हाणे येथे एक एकर क्षेत्रात प्रथमच झेंडूची शेती केली. गणेशोत्सवाच्या काळात फुलांची विक्री सुरू झाली असून, ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
कळवंडे हे वरपे दांपत्याचे मूळ गाव. योगेश वरपे हे दुचाकी मेकॅनिक म्हणून व्यवसाय करतात. मात्र, व्यवसायासोबत शेतीची आवड आणि ग्रामीण मातीशी असलेले नाते त्यांनी जपले आहे. आपल्या पत्नी रेवती वरपे यांच्या सहकार्याने ते कळवंडे येथे कलिंगड आणि लिली फुलांची शेती करतात. याच शेतीच्या अनुभवातून त्यांनी गावापासून सुमारे साडेसतरा किलोमीटर अंतरावर असलेल्या कौंढर ताम्हाणे येथे झेंडू फुलांची लागवड करण्याचा प्रयोग हाती घेतला. ६ जुलै २०२६ रोजी मशागतीला सुरुवात करून एक एकर क्षेत्रात झेंडूची शेती उभी केली. गणेशोत्सवात विक्री सुरू झाल्यानंतर ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. चिपळूण तालुक्यातील चिपळूण शहरासह सावर्डे, मार्गताम्हाणे आणि खेर्डी या परिसरात विविध बाजारपेठा आहेत. सण-उत्सवांच्या काळात झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते. स्थानिक पातळीवर उत्पादन उपलब्ध झाल्याने ग्राहकांना परिसरातील शेतकऱ्याकडून फुले खरेदी करण्याचा पर्याय मिळत आहे.
----
इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी
वैयक्तिक स्वरूपात सुरू केलेल्या या एक एकराच्या प्रकल्पातून स्थानिक शेतीला चालना देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. शेतीमध्ये नवे प्रयोग करण्याची तयारी आणि बाजारपेठेची गरज ओळखून उत्पादन घेण्याची वृत्ती इतर शेतकऱ्यांसाठीही प्रेरणादायी ठरू शकते. शेतीसोबत अन्य व्यवसाय सांभाळत शेतीतील नवे प्रयोग यांच्या जोरावर ग्रामीण भागातील तरुण शेतकरीही नवनवीन संधी निर्माण करू शकतात, हे वरपे दांपत्याच्या झेंडूच्या मळ्याने दाखवून दिले आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com