

rat२१p६.jpg-
P26O65363
रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची श्री मनाचे श्लोक, भगवद्गीता पठण स्पर्धा जांभेकर विद्यालयात झाली. विजेत्या विद्यार्थ्यांसोबत मान्यवर आणि परीक्षक.
---
श्लोक-गीता पठणाने भक्तिमय वातावरण
जांभेकर विद्यालयात आयोजन ; विद्यार्थ्यांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २१ : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी अंतर्गत विविध प्रशालांमधील विद्यार्थ्यांसाठी श्री मनाचे श्लोक व भगवद्गीता पंधरावा अध्याय पठण स्पर्धा सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयात भक्तीमय वातावरणात झाली. स्पर्धांचे सर्व नियोजन जांभेकर विद्यालयाने सुनियोजित पद्धतीने केले.
विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, आध्यात्मिक विचार व संस्कृत वाङ्मयाबद्दल आवड निर्माण व्हावी, तसेच विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्ती, उच्चारशुद्धता, आत्मविश्वास व वक्तृत्वकलेला वाव मिळावा, या उद्देशाने या पठण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. निशिगंधा पोंक्षे, नेत्रा काटदरे, माया तांबे व ऋतुजा माईनकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. विद्यार्थ्यांच्या उच्चारशुद्धता, स्मरणशक्ती, सादरीकरण, भावपूर्ण पठण व आत्मविश्वास या विविध निकषांच्या आधारे परीक्षकांनी स्पर्धेचे परीक्षण केले. सचिन साठे यांनी सूत्रसंचालन केले.
स्पर्धेचा निकाल- लहान गट – श्री मनाचे श्लोक- प्रथम : आर्या काटदरे (जीजीपीएस), द्वितीय विभागून : किमया साखळकर (रा. भा. शिर्के प्रशाला), नमिता सागवेकर (सौ. गोदूताई जांभेकर विद्यालय), तृतीय विभागून : वैष्णवी प्रभूदेसाई (रा. भा. शिर्के प्रशाला), विहान परांजपे बाबूराव जोशी गुरुकुल, जीजीपीएस). उत्तेजनार्थ : उर्वी कळंबटे (ॲड. बाबासाहेब नानल गुरुकुल), सौम्या आठल्ये (जीजीपीएस). मोठा गट – भगवद्गीता पंधरावा अध्याय- प्रथम- श्रेया भातडे (सौ. गोदूताई जांभेकर विद्यालय), द्वितीय क्रमांक विभागून : ज्ञानदा नातू (जीजीपीएस), श्रावणी केळकर (एस. वाय. गोडबोले विद्यामंदिर, केळ्ये), तृतीय क्रमांक विभागून : अवनीश वझे (नानल गुरूकुल), गार्गी केळकर (एस. वाय. गोडबोले विद्यामंदिर, केळ्ये), उत्तेजनार्थ : अर्णव जोशी (जीजीपीएस) पूर्वा पवार (एस. वाय. गोडबोले विद्यामंदिर, केळ्ये).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.