मिशन प्रबोधन पोहचले 15 लाख लोकांपर्यंत

मिशन प्रबोधन पोहचले 15 लाख लोकांपर्यंत
Published on

rat२२p३.jpg-
26O65531
रत्नागिरी- रत्नागिरी नागरी संरक्षक दल आणि पोलिसदल.
----
‘मिशन प्रबोधन’द्वारे थेट जनतेशी संवाद
नितीन बगाटे ः एआय अन् तंत्रज्ञानाचे घेतले साह्य
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २२ : कायदा व सुव्यवस्थेचे पालन, सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण आणि सामाजिक सलोखा अधिक दृढ करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलिसदलाच्या ‘मिशन प्रबोधन’ या अभिनव व नागरिकाभिमुख उपक्रमांतर्गत सुमारे १५ लाख नागरिकांपर्यंत पोचण्यात यश आले आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगोटे यांनी दिली. या माध्यमातून जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचून पोलिस आणि जनता यांच्यातील विश्वास अधिक दृढ करण्याचा मानस बगाटे यांनी व्यक्त केला.
पोलिस अधीक्षक बगाटे आणि अप्पर पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सर्वत्र राबवली जात आहे. या उपक्रमाद्वारे पोलिसदलाचा संवाद केवळ पोलिस ठाण्यांपुरता मर्यादित न राहता, जिल्ह्यातील ग्रामसभा, शाळा-महाविद्यालये, सार्वजनिक ठिकाणे आणि शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाच्या घरापर्यंत थेट पोहोचणार आहे. ​‘मिशन प्रबोधन’ची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता एआय (AI) आणि आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला जाणार आहे. कायदेशीर तरतुदी, सायबर सुरक्षेचे नियम आणि फसवणुकीपासून बचावाचे उपाय नागरिकांना सोप्या भाषेत समजण्यासाठी एआय आधारित तंत्रज्ञान, व्हिडिओ, ॲनिमेशन, माहितीपट आणि संवादात्मक डिजिटल कंन्टेटचा वापर होईल. यापूर्वी रत्नागिरी पोलिसांकडून कार्यरत असणाऱ्या एआय-पॉवर्ड रेड्स ॲप, जीआयएस-बेस्ड बंदोबस्त ॲप आणि रत्नसेतु एआय असिस्टंटसारख्या तंत्रज्ञानाला या मोहिमेतून अधिक बळ दिले जाणार आहे, असे बगाटे यांनी सांगितले.

----
हे आहेत नागरिकाभिमुख उपक्रम
* आणीबाणीप्रसंगी तत्काळ पोलिस मदत डायल ११२
*​ सायबर जागृती हेल्पलाईन १९३०
* मिशन रायझिंग फ्लॉवर्सद्वारे अमली पदार्थांविरोधात जनजागृती
* मिशन फोएनिक्सद्वारे अमली पदार्थांविरोधात कठोर कारवाई
*​मिशन प्रगती हेल्पलाईन ९११२२२१६३२
* मिशन प्रतिसाद हेल्पलाईन ९६८४७०८३१६ / ८३९०९२९१०० द्वारे समस्या सोडवणे
*​मिशन रॅपिडद्वारे नागरिकाभिमुख आणि अधिक गतिमान पोलिससेवा देणे
* वाहन चालवताना मोबाईलचा वापर टाळण्यासाठी मिशन टेप फॉर सेफ विशेष मोहीम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com