एमयू-प्रज्ञाद्वारे करिअरविषयक कल समजणे शक्य

एमयू-प्रज्ञाद्वारे करिअरविषयक कल समजणे शक्य
Published on: 

- rat२p७.jpg-
26O67420
देवरूख ः ‘एमयू-प्रज्ञा’ मानसशास्त्रीय मूल्यांकन उपक्रमाच्या प्रारंभ प्रसंगी प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांच्यासोबत प्रा. विकास शृंगारे, प्रा. डॉ. सुभाष मायंगडे, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील व प्रा. पिया मोरे.
---
‘एमयू-प्रज्ञा’तून करिअरची दिशा उलगडणार
देवरूख महाविद्यालयाचा उपक्रम; प्रामाणिकपणे चाचणी पूर्ण करण्याचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
देवरूख, ता. २ ः विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य, व्यक्तिमत्त्व, आवडीनिवडी, मानसिक लवचिकता तसेच भविष्यातील करिअरविषयक कल जाणून घेण्यासाठी देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे स्वायत्त महाविद्यालयात मुंबई विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली ‘एमयू-प्रज्ञा’ या मानसशास्त्रीय मूल्यांकन उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखून त्यांना योग्य मार्गदर्शन व साहाय्य उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी या चाचणीत सहभागी होऊन ती पूर्ण करावी, असे आवाहन प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी केले आहे. या उपक्रमातील चाचणी संगणकीय पद्धतीने (ऑनलाईन) घेतली जात असून, विद्यार्थी महाविद्यालयातून किंवा घरून आपल्या सोयीनुसार ती पूर्ण करू शकतात. यामध्ये मानसिक स्वास्थ्य, भावनिक स्थैर्य आणि करिअरविषयक आवडीवर आधारित प्रश्नांचा समावेश आहे. या चाचणीत ‘योग्य’ किंवा ‘अयोग्य’ असे उत्तर नसून, स्वतःचे अचूक मूल्यांकन व्हावे यासाठी विद्यार्थ्यांनी कोणताही ताण न घेता प्रामाणिक उत्तरे देणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांच्या सुलभतेसाठी महाविद्यालयाने टप्प्याटप्प्याने स्पष्ट सूचना दिल्या आहेत. या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर आणि उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. डॉ. सुभाष मायंगडे, प्रा. विकास शृंगारे आणि प्रा. पिया मोरे यांची शिक्षक समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
----
अहवाल तत्काळ मिळणार
चाचणी पूर्ण होताच विद्यार्थ्यांना स्वतःचा मानसशास्त्रीय अहवाल तत्काळ पाहता व डाऊनलोड करून जतन करता येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना स्वतःच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलू आणि करिअरच्या संधी समजून घेण्यास मदत होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com