‘स्मार्ट स्टिक’ने पटकावला प्रथम क्रमांक

‘स्मार्ट स्टिक’ने पटकावला प्रथम क्रमांक
Published on: 

‘स्मार्ट स्टिक’ ठरली अव्वल
आंतरमहाविद्यालयीन प्रकल्प स्पर्धा ; संशोधनास चालना
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. २ : तालुक्यातील वेळणेश्वर येथील महर्षी परशुराम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये झालेल्या आंतरमहाविद्यालयीन प्रकल्प स्पर्धेत २४ महाविद्यालयांमधील ७१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यांनी आपले तंत्रज्ञानविषयक कल्पक प्रकल्प सादर केले. यामध्ये निवेबुद्रुक येथील माध्यमिक आश्रमशाळेच्या सायली माने व दिया लाड यांनी सादर केलेल्या ‘बहुउद्देशीय काठी (स्मार्ट स्टिक)’ या प्रकल्पाने प्रथम क्रमांक पटकावला.
वेळणेश्वर येथे झालेल्या या कार्यक्रमाचे उद्‍घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश पवार यांच्या हस्ते झाले. तसेच पारितोषिक वितरण नाना फडणवीस सभागृहात झाले. यानंतर प्रा. डॉ. गणेश दिवे यांनी स्पर्धेचा सविस्तर आढावा सादर केला. ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, नाविन्यता आणि संशोधन वृत्तीला व्यासपीठ मिळवून देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता. पुस्तकी ज्ञानाला प्रत्यक्ष व्यवहारात कसे आणावे, दैनंदिन सामाजिक व तांत्रिक समस्यांवर तंत्रज्ञानाच्या साह्याने किफायतशीर उपाय कसे शोधावेत, याचे मोलाचे धडे विद्यार्थ्यांनी या स्पर्धेतून घेतले. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये सादरीकरण कौशल्य, संघकार्य आणि तांत्रिक चिकित्सक विचारसरणीचा विकास होण्यास मोठी मदत झाली. या स्पर्धेत माने व लाड यांनी सादर केलेल्या ‘बहुउद्देशीय काठी (स्मार्ट स्टिक)’ या प्रकल्पाने प्रथम क्रमांक पटकावला. तर एसव्हीजेसीटी इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, सावर्डे येथील गार्गी थोरात व गार्गी पवार यांच्या ‘ऑटोमॅटिक प्लॅटफॉर्म कनेक्टर’ या प्रकल्पाने द्वितीय क्रमांक मिळवला. तसेच ज्युनिअर कॉलेज, मार्गताम्हाणे येथील सोम सावंत, प्रतीक शिगवण व प्रतीक दांदणे यांनी तयार केलेल्या ‘स्टार्क - स्कूल रिपोर्टिंग सिस्टिम’ या प्रकल्पाला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com