

एसटीच्या ताफ्यात २०० ‘एसी वोल्वो’
ऑनलाइन आरक्षणाची सुविधा; प्रवाशांना दिलासा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ : महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) खासगी ट्रॅव्हल्सशी स्पर्धा करण्यासाठी प्रवाशांना अधिक आरामदायी आणि आधुनिक सेवा देण्यावर भर दिला आहे. महामंडळाच्या ताफ्यात लवकरच तब्बल २०० अत्याधुनिक ‘एसी वोल्वो’ बस दाखल होणार असून, २५० किलोमीटरपेक्षा अधिक अंतराच्या तसेच पाच ते सहा तासांच्या प्रवासासाठी या बस चालवण्याचे नियोजन आहे.
ग्रामीण भागापासून शहरांपर्यंत सर्वसामान्य प्रवाशांना विश्वासार्ह सेवा देणाऱ्या एसटीने आता लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आरामदायी सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. ४५ आसनी वातानुकूलित वोल्वो बसच्या माध्यमातून प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाचा पर्याय मिळणार आहे. महामंडळाकडून प्रत्येक विभागातील प्रवाशांची मागणी, मार्गाची गरज आणि प्रवासीसंख्या यांचा अभ्यास करून त्यानुसार बसचे वितरण केले जाणार आहे. या बससेवेसाठी ऑनलाइन तिकीट आरक्षणाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना घरबसल्या तिकीट आरक्षित करता येणार आहे. एसी सुविधा, आरामदायी आसने, कमी वेळेत प्रवास आणि रात्रीच्या प्रवासातील सोयी यामुळे खासगी ट्रॅव्हल्सना स्वतंत्र प्रवासीवर्ग मिळाला आहे. त्यामुळे एसटीकडून प्रवाशांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.