

rat2p19.jpg-
67410
देवरूख ः निवडणूक प्रक्रियेतील कथित गैरप्रकारांविरोधात आंदोलन केल्यानंतर तहसीलदार अमृता साबळे यांना निवेदन देताना आंदोलक.
निवडणुकीतील गैरप्रकारांविरोधात
देवरूखात तीव्र निदर्शने
सकाळ वृत्तसेवा
देवरूख, ता. २ ः निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचा आणि कथित गैरप्रकार झाल्याचा आरोप करत संगमेश्वर तालुक्यातील नागरिकांनी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून देवरूख पोलिस ठाण्यासमोर शुक्रवारी (ता. २) सकाळी निदर्शने केली. या वेळी आंदोलकांनी तीव्र निषेधही नोंदवला.
देवरूख येथे निदर्शनानंतर आंदोलकांच्या शिष्टमंडळाने देवरूखच्या तहसीलदार अमृता साबळे यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. यामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना तत्काळ पदावरून हटवून त्यांच्यावर अटकेची कारवाई करावी, त्यांच्या कार्यकाळात पार पडलेल्या संशयास्पद व कथित गैरमार्गाच्या निवडणुका रद्द करून त्या ठिकाणी पारदर्शक पद्धतीने पुनर्मतदान घेण्यात यावे, निवडणूक प्रक्रियेतील कथित हस्तक्षेपाला जबाबदार धरत केंद्र सरकारवरही कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशा मागण्या केल्या आहेत.
या आंदोलनात संगमेश्वर तालुक्यातील नागरिक व विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये युयुत्सू आर्ते, ॲड. लक्ष्मीकांत जाधव, बंड्या बोरूकर, नीलेश भुवड, नितीन लोकम, प्रदीप गुरव, विनय पानवळकर, शेखर जोगळे, अभिजित पाटील, संजय मोहिते, काशिनाथ वाजे यांच्यासह अनेक नागरिकांची उपस्थिती होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.