

rat2p22.jpg-
67427
रत्नागिरी ः जिल्हा बार असोसिएशनतर्फे निवेदन देताना जिल्हाध्यक्ष विलास पाटणे आणि अन्य वकील.
समान पदाकरिता समान वेतन द्या
ॲड. विलास पाटणेः कर्मचाऱ्यांचे आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ : जिल्ह्यातील न्यायालयीन कर्मचारी यांना सुधारित वेतनवाढ मिळण्यासाठी कर्मचारी आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत. समान पदाकरिता समान वेतन द्यावे, हा कर्मचाऱ्यांचा हक्क आहे. त्यामुळे त्यांची मागणी योग्य असून, या आंदोलनाला जिल्हा बार असोसिएशनचा पाठिंबा असून संघटनेला पूर्ण सहकार्य राहील, असे आश्वासन रत्नागिरी बारचे अध्यक्ष ॲड. विलास पाटणे यांनी दिले.
न्यायालयातील लिपिक, स्टेनोग्राफर, बेलीफ, शिपाई आदी जिल्ह्यातील सर्व न्यायालयीन कर्मचारी न्यायव्यवस्थेचा भाग आहेत. अपुऱ्या मनुष्यबळात न्यायालयीन कर्मचारी ताण सहन करत आपल्या जबाबदारीने काम करत आहेत. वेतन व सेवाविषयक मागण्यांकडे दुर्लक्ष झाले आहे. त्याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.
न्यायालयीन कर्चमारी प्रथम काळी फित लावून निषेध नोंदवतील. पाच नोव्हेंबर रोजी रजा आंदोलन आणि १७ नोव्हेंबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन राहील, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष सचिन जाखी यांनी दिली. त्यांनी संघटनेला सहकार्य करण्याची विनंती बार असोसिएशनला केली. या वेळी बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. निनाद शिंदे, कोषाध्यक्ष ॲड. अवधूत कळंबटे, सहसचिव राहुल चाचे, संघटनेचे सचिव राकेश शिंदे, प्रशांत सावंत आणि कौस्तुभ सावंत आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.