राजापुरात काँग्रेसची नवीन तालुका कार्यकारिणी

राजापुरात काँग्रेसची नवीन तालुका कार्यकारिणी
Published on: 

rat२p२५.jpg-
26O67481
राजापूर ः ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते सुरेंद्र तांबे यांचा सत्कार करताना तालुकाध्यक्ष सतीश बंडबे आणि पदाधिकारी.

राजापुरात काँग्रेसची नवीन
तालुका कार्यकारिणी गठित
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ३ ः काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमीर खलिफे आणि तालुकाध्यक्ष सतीश बंडबे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज राजापूर तालुका काँग्रेसची बैठक झाली. या बैठकीत नवनियुक्त तालुकाध्यक्ष सतीश बंडबे यांच्या नेतृत्वाखालील राजापूर तालुका काँग्रेसची नवीन कार्यकारिणी गठित करण्यात आली. ही कार्यकारिणी आगामी आढावा बैठकीमध्ये अधिकृतपणे जाहीर केली जाणार आहे.
राजापुरात झालेल्या या बैठकीस नगराध्यक्षा तथा माजी आमदार ॲड. हुस्नबानू खलिफे, ज्येष्ठ नेते देवदत्त वालावलकर, शहराध्यक्ष अजीम जैतापकर, राजापूर अर्बन बँकेचे माजी संचालक लियाकत काझी, नगरसेवक महेश शिवलकर, सुलतान ठाकूर, सिद्धांत जाधव, शबाना मुल्ला, अमिना गडकरी, जान्हवी वादक, अफरोज झारी, अदनान खलिफे, इम्रान मुजावर, हारून साठी, सुरेंद्र तांबे आणि रघुनाथ आडिवरेकर यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
येत्या सोमवारी (ता. ५) रत्नागिरी जिल्हा (दक्षिण विभाग) काँग्रेसची सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला राजापूर तालुक्यातून जास्तीत जास्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन या वेळी करण्यात आले आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com