आरटीओच्या ''सेवा संकल्प अभियाना''ला मोठा प्रतिसाद

आरटीओच्या ''सेवा संकल्प अभियाना''ला मोठा प्रतिसाद
Published on: 

गावातच शिकाऊ वाहन परवान्याची सुविधा
आरटीओचे ‘सेवा संकल्प अभियान’ ; ४३१ जणांना मिळाला लाभ
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्यामार्फत १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये विशेष शिबिरांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिरांमधून ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना त्यांच्या दारातच शिकाऊ वाहन चालकांना लर्निंग लायसन्स उपलब्ध करून देण्यात आली. तालुकानिहाय शिबिरांमध्ये तब्बल ४३१ उमेदवारांना शिकाऊ वाहन परवान्याचे (लर्निंग लायसन्स) वितरण करण्यात आले. यासोबतच जिल्हा मुख्यालय कार्यालयातही ३७४ लाभार्थ्यांनी या सेवेचा लाभ घेतला.
तालुकास्तरीय शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांना थेट सेवा मिळावी या उद्देशाने प्रशासनाने नियोजनबद्ध पावले उचलली होती. संबंधित तालुक्यांच्या तहसीलदारांच्या हस्ते उमेदवारांना अधिकृतरीत्या लायसन्स वाटप करण्यात आले. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतुकीचे नियम, विविध रस्ते चिन्हे, हेल्मेट व सीटबेल्टचा वापर आणि सुरक्षित वाहन चालवण्याच्या पद्धतींविषयी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. दर अभियान उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले. शिबिरांच्या यशस्वीतेसाठी मोटार वाहन निरीक्षक जावीद शिकलगार तसेच सहायक मोटार वाहन निरीक्षक अक्षय ल. पाटील, इंद्रजित मोहिते, सत्यवंत पाटील, मोहसीन आवटी आणि अवधूत कुंभार यांनी परिश्रम घेतले.
----
तालुकानिहाय लाभार्थी संख्या
लांजा ः ५९
राजापूर ः ३४
गुहागर ः १६
चिपळूण ः ६०
दापोली ः ७४
खेड ः ८५
देवरुख ः ५५
मंडणगड ः ४८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com