राजापूर :राजापुरात 89 गावांतील 353 हेक्टर क्षेत्र बाधित

राजापूर :राजापुरात 89 गावांतील 353 हेक्टर क्षेत्र बाधित
Published on: 

rat४p८.jpg-
67752
राजापूर ः दसूर येथे भातशेतीच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामा करताना कृषी अधिकारी.
-------------
राजापुरात ८९ गावांतील
३५३ हेक्टर क्षेत्र बाधित
भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे सुरू ; २३७ गावांमध्ये शेतीला फटका
राजापूर, ता. ४ ः कमी पावसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाल्यानंतर राजापूर तालुक्यात पंचनाम्यांना सुरुवात झाली आहे. कृषी, महसूल आणि ग्रामपंचायत यंत्रणेची संयुक्त पथके शेताच्या बांधावर पोहोचून नुकसानीची नोंद करत आहेत. मात्र, तालुक्यातील २३७ गावांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतीचे क्षेत्र असल्याने निर्धारित कालावधीत पंचनामे पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.
यावर्षी कमी पावसाचा फटका भातशेतीसह नाचणी, वरी आदी पिकांना बसला आहे. तालुक्यात सुमारे ७ हजार १०० हेक्टर क्षेत्रावर या पिकांची लागवड करण्यात आली असून, त्यापैकी सुमारे ४ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. यामध्ये सुमारे २५ हजार शेतकऱ्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.
राजापूर तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश केला आहे. त्यानंतर नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. कृषी विभाग, ग्रामपंचायत अधिकारी आणि महसूल विभागाच्या माध्यमातून पंचनाम्याचे काम वेगाने सुरू आहे. आजपर्यंत ८९ गावांतील १ हजार १२८ शेतकऱ्यांच्या ३५३.१५ हेक्टर बाधित क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.

दृष्टीक्षेपात राजापूर
* एकूण गावे ः २३७
* एकूण लागवड (पेरणी) क्षेत्र ः ७१०० हेक्टर
* बाधित क्षेत्र ः ४ हजार हेक्टर
* नुकसानग्रस्त शेतकरी ः २५ हजार शेतकरी

शेती नुकसानीचे पंचनामे
* पंचनामे झालेली गावे ः ८९
* पंचनामे झालेले क्षेत्र ः ३५३.१५ हेक्टर
* पंचनामे झालेले शेतकरी ः ११२८
-----------
चौकट
शेती कसणाऱ्यालाच फायदा द्यावा

तालुक्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी भातशेती केली आहे मात्र, त्यांच्या नावावर संबंधित जागेचा सात-बारा उतारा नाही, त्या जागेचा मालक वेगळाच आहे अशी स्थिती आहे. अनेक शेतकरी दुसर्‍याची जमीन तोंडी कराराने कसतात मात्र, त्यांचा प्रत्यक्षात कागदोपत्री करार नाही. अशा स्थितीमध्ये कमी पर्जन्यनाचा फटका बसून भातशेतीच्या नुकसानीचा तडाखा बसलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये शासनाकडून नुकसानभरपाईची रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे त्याचा पटका जमीन कसणाऱ्याला बसणार आहे. यावर शासनाने तोडगा काढावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com