

खेडच्या भातशेतीवर पावसाचे संकट
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ५ : तालुक्यात यंदा पावसाने सुरुवातीला चांगली हजेरी लावली; मात्र ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाने दडी मारली. त्यामुळे कातळ व वरकस जमिनीतील शेतीत भाताच्या लोंब्या भरण्यापूर्वीच करपून गेल्या आहेत. त्यामुळे तालुक्यात भाताच्या उत्पादनात ५० टक्क्यांहून अधिक घट होण्याची शक्यता कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजातून व्यक्त होत आहे.
खेड तालुक्यात दरवर्षी सुमारे सहा हजार हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड केली जाते. यंदा मोसमी हंगामात तालुक्यात सुमारे ३०९९ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, सप्टेंबरअखेर वार्षिक सरासरीच्या सुमारे ८५ ते ९० टक्के पाऊस झाल्याचे सांगण्यात येते; मात्र, भातपिकांच्या वाढीच्या आणि लोंब्या भरण्याच्या निर्णायक टप्प्यात पावसाने ओढ दिल्याने हळवी तसेच गरवी भातपिके धोक्यात आली आहेत. पिकांच्या नुकसानीची वस्तुनिष्ठ माहिती मिळवण्यासाठी प्रशासनाने पंचनाम्याची विशेष मोहीम सुरू केली आहे. कार्यालयीन नोंदींवर अवलंबून न राहता तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी साहाय्यक यांची संयुक्त पथके थेट शेतांवर जाऊन पाहणी करत आहेत. या पंचनाम्यांनंतर किती क्षेत्रावरील भातपिकांचे नुकसान झाले आहे, याचे नेमके चित्र स्पष्ट होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.