सोसा स्पर्धेत एसव्हीएम संघाची सरशी

सोसा स्पर्धेत एसव्हीएम संघाची सरशी
Published on: 

- rat५p१.jpg-
26O67877
रत्नागिरी ः सोसा क्रिकेट स्पर्धेत विजयी झालेला संघ.
---
सोसा स्पर्धेत एसव्हीएम संघाची सरशी
१३ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धा; एम्स क्रिकेट अकादमी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ५ ः स्थानिक मैदानावर झालेल्या आणि सोसा अंडर १३ रायझिंग क्रिकेट स्पर्धेत चुरशीच्या सामन्यात एसव्हीएम क्रिकेट संघाने उत्कृष्ट गोलंदाजी आणि संयमी फलंदाजीच्या जोरावर एम्स क्रिकेट अकादमीचा आठ विकेटस् राखून पराभव केला.
नाणेफेक जिंकल्यानंतर एम्स क्रिकेट अकादमीने प्रथम फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतला; मात्र, एसव्हीएमच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर एम्सच्या फलंदाजांना मैदानावर टिकाव धरता आला नाही. ठराविक अंतराने गडी बाद होत गेल्यामुळे एम्सच्या संघाला निर्धारित २३ षटकांत सात खेळाडूंच्या मोबदल्यात केवळ १२५ धावांपर्यंतच मजल मारता आली. एम्स अकादमीकडून फलंदाज दैविक वैगणकर याने एका बाजूने संघर्ष करत ४६ चेंडूंत ५३ धावांची एकाकी अन् झुंजार खेळी केली. संघाच्या एकूण धावसंख्येत त्याचा मोठा वाटा राहिला; मात्र इतर कोणत्याही फलंदाजाला त्याला योग्य साथ देता आली नाही.​ एसव्हीएम संघाकडून गोलंदाजांनी अत्यंत अचूक आणि भेदक मारा केला. समर सावंतने पाच षट्कांत १६ धावा देत तीन महत्त्वाचे खेळाडू बाद केले. त्याला योग्य साथ देत सिद्धार्थ सावंतनेदेखील चार षट्कांत अवघ्या १७ धावांच्या मोबदल्यात दोन बळी टिपले. या दोन्ही गोलंदाजांनी एम्सच्या फलंदाजांना हात उघडण्याची अजिबात संधी दिली नाही. १२७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या एसव्हीएम संघाने आक्रमक सुरुवात केली. फलंदाजांनी संयम आणि आक्रमकता यांचा सुरेख मेळ घालत अवघ्या १८.३ षट्कांत दोन फलंदाजांच्या मोबदल्यात १२७ धावा करून विजय साकारला. फलंदाजीत सिद्धार्थ सावंतने ४४ चेंडूत ४२ धावांची उपयुक्त खेळी केली तर सिद्धांत जाधवने ४६ चेंडूत नाबाद ५२ धावा करत संघाला विजयाच्या रेषेपार पोहोचवले. या शानदार विजयामागे मुख्य प्रशिक्षक प्रमोद वानखेडे आणि सहायक प्रशिक्षक नवीन सावंत यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. रणनीतीची योग्य अंमलबजावणी करत एसव्हीएम संघाने या सामन्यात पूर्णपणे वर्चस्व गाजवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com