देवरूख-पांगरी-रत्नागिरी मार्गावरील झाडी हटविण्यास प्रारंभ

देवरूख-पांगरी-रत्नागिरी मार्गावरील झाडी हटविण्यास प्रारंभ
Published on: 

-rat५p११.jpg-
26O67932
देवरूख ः देवरूख-पांगरी-रत्नागिरी मार्गावरील झाडी हटवण्याचे काम सुरू झाले आहे.
---
झाडी हटली; मार्ग झाला मोकळा

देवरूख-पांगरी-रत्नागिरी मार्गावरील सफाई सुरू

सकाळ वृत्तसेवा
देवरूख, ता. ५ ः देवरूख-पांगरी-रत्नागिरी मार्गाच्या दुतर्फा वाढलेले गवत व झाडी वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत असल्याबाबत ‘सकाळ’ने गेल्या आठवड्यात वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत सोमवारी या मार्गावरील वाढलेले गवत व झाडी हटवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली.
रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात वाढलेल्या झाडीमुळे अनेक ठिकाणी वाहनचालकांना समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज घेण्यात अडचणी येत होत्या. विशेषतः तीव्र वळणे आणि उताराच्या ठिकाणी झाडी रस्त्यावर आली असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला होता. याबाबत प्रवाशांकडूनही सातत्याने नाराजी व्यक्त होत होती. ‘सकाळ’ने या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधताच सोमवारी प्रत्यक्ष साफसफाईच्या कामाला सुरुवात झाली. रस्त्याच्या दुतर्फा वाढलेले गवत, झुडपे व झाडी हटवून मार्ग मोकळा करण्यात येत आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पावसाळ्यानंतर वाढलेल्या गवतामुळे अरुंद झालेला रस्ता आता मोकळा होणार असल्याने या मार्गावरील वाहतुकीची सुरक्षितता वाढण्यास मदत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com