गतवर्षी टँकरच्या 3,177 फेऱ्यांनी पाणीपुरवठा

गतवर्षी टँकरच्या 3,177 फेऱ्यांनी पाणीपुरवठा
Published on: 

यंदा टँकरची गरज अधिक भासणार

४७ हजार नागरिकांना गतवर्षी टँकरचा आधार

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ६ : रखरखत्या उन्हात घशाला पडलेली कोरड आणि पाण्यासाठी मैलोनमैल भटकणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांसाठी जिल्हा परिषदेचा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग देवदूत ठरला. २०२६च्या कडक उन्हाळ्यात जिल्ह्याला भेडसावणाऱ्या तीव्र पाणीटंचाईवर मात करत प्रशासनाने ३ हजार १७७ टँकरच्या फेऱ्यांद्वारे ४७ हजार नागरिकांची तहान भागवली होती. यंदाही त्यापेक्षा अधिक टँकरच्या फेऱ्या लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गतवर्षी टंचाई कालावधीत जिल्ह्यातील ७० गावे आणि १६२ वाड्यांमधील ४७ हजार ४८८ नागरिकांना नियमित पाणी पोहोचवण्यात आले. यासाठी प्रशासनाने तीन शासकीय आणि १५ खासगी अशा तब्बल १८ टँकर्सची यंत्रणा रात्रंदिवस कार्यरत ठेवली होती. रत्नागिरी तालुक्याला टंचाईचा सर्वाधिक फटका बसला होता. १० गावांमधील ३९ वाड्यातील २३ हजार ७९१ नागरिकांची तहान भागवण्यासाठी १० खासगी टँकर्सच्या मदत घेण्यात आली. १ हजार ८७८ फेऱ्या झाल्या. ही सेवा ६ एप्रिल ते १५ जूनदरम्यान सुरू होती. इतर तालुक्यांमध्येही प्रशासनाने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरळीत ठेवला. संगमेश्वर तालुक्यात २१ गावातील ४४ वाड्यांत ३ टँकर्सद्वारे ४४९ फेऱ्या, मंडणगड तालुक्यात १० मार्च ते २३ जून या प्रदीर्घ काळात ८ गावातील ८ वाड्यांमधील एका खासगी टँकरच्या ४२१ फेऱ्या, खेड तालुक्यात १४ गावातील ३० वाड्यांमधील १ शासकीय टँकर २७ जुलैपर्यंत १९६ फेऱ्या पूर्ण केल्या. चिपळूण तालुक्यात ११ गावातील २७ वाड्यांना खासगी टँकरच्या १५२ फेऱ्यांनी पाणी दिले गेले. दापोली तालुक्यात ५ गावातील १३ वाड्यांमधील लोकांनी ५२ फेऱ्यांद्वारे तर गुहागर तालुक्यातील १ गावातील १ वाडीतील लोकांना २९ फेऱ्यांद्वारे टँकरचे पाणी पुरवण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com