

गणित-विज्ञानाच्या डिजिटल सराव
‘डॉ. नारळीकर समृद्धी कार्यक्रम’; अडीच हजार विद्यार्थी सहभागी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ६ ः जिल्ह्यातील शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये राबवल्या जाणाऱ्या ‘डॉ. जयंत नारळीकर गणित आणि विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम २०२६-२७’ चा ४ ऑक्टोबर अखेरचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. प्राप्त आकडेवारीनुसार, रत्नागिरी जिल्ह्याने ५४ हजार ५३६ एकूण पटसंख्येच्या तुलनेत ३७ हजार २०९ विद्यार्थ्यांची ६८ टक्के नोंदणी पूर्ण केली आहे. जिल्ह्यातील १,९३८ शाळा ८१ टक्के या कार्यक्रमात सहभागी झाल्या असून, २ हजार ५१० विद्यार्थी सक्रियपणे अभ्यासक्रमात सहभागी होत आहेत.
सर्व विद्यार्थ्यांना प्लॅटफॉर्मवर डिजिटल सराव नियमितपणे करता यावा यासाठी शाळा आणि केंद्रांमधील विद्यार्थ्यांच्या सक्रियकरणातील अडचणींचा तत्काळ आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, उर्वरित विद्यार्थ्यांना प्लॅटफॉर्मवर सक्रिय करण्यासाठी केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी विशेष प्रयत्न करावेत, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील काही केंद्रांनी अत्यंत उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. त्यात मंडणगडमधील चिंचघर आणि संगमेश्वरमधील सायले केंद्र सर्वाधिक ४१ टक्के सक्रिय विद्यार्थ्यांसह जिल्ह्यात अग्रस्थानी आहेत. राजापूर तालुक्यातील ससाळे क्र. १, भालावली क्र. १, तळगाव क्र. १ या तिन्ही केंद्रांनी समाधानकारक कामगिरी केली आहे. गुहागरमधील चिखली व अंजनवेल तर दापोलीतील उन्हावरे क्र. १ या केंद्रांनी विशेष प्रयत्न केले आहेत.
अनेक तालुक्यांमध्ये शाळा आणि विद्यार्थ्यांची नोंदणी मोठ्या प्रमाणावर झाली असली तरी प्रत्यक्ष सराव करणाऱ्या सक्रिय विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढवणे, हे मुख्य उद्दिष्ट असणार आहे. त्यासाठी सर्व केंद्रांमधील शिक्षक आणि अधिकारी स्तरावर विशेष प्रयत्न सुरू आहेत.
---
तालुका*नोंदणीकृत शाळा*एकूण पटसंख्या*नोंदणीकृत विद्यार्थी*सक्रिय विद्यार्थी
रत्नागिरी* ३०४* ११,३३७* ९,४६०* ८८३
संगमेश्वर* २८८* ६,३३१* ५,३२०* ३२७
राजापूर* २६०* ६,२२२* ४,४२९* ४३६
गुहागर* १५८* ४,८०१* ३,२५२* २१४
दापोली* १७८* ६,०२६* २,८३६* २५८
मंडणगड* ११४* २,९१२* १,६३१* ९६
खेड* २३४* ५,२६९* २,६६५* ९६
चिपळूण* २३१* ६,६७६* ४,१८१* ११७
लांजा* १७१* ४,९६२* ३,४३५* ८३
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.