

मत्स्य अभियांत्रिकीतर्फे निबंध स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ६ : विद्यार्थी व युवकांमध्ये शाश्वत मत्स्यव्यवसाय, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर तसेच ‘विकसित भारत २०४७’च्या संकल्पनेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी शहराजवळील शिरगाव येथील मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनतर्फे ‘सेवासंकल्प’ अभियानांतर्गत निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत मच्छीमार सहकारी संस्थांच्या सभासदांच्या पाल्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.
स्पर्धेसाठी ‘विकसित भारत २०४७ : शाश्वत मत्स्य व्यवसायाची दिशा आणि उद्दिष्टे’ आणि ‘तंत्रज्ञानाच्या साथीने मत्स्यक्षेत्राचा विकास : विकसित भारताकडे वाटचाल’ हे दोन विषय देण्यात आले आहेत. इच्छुक स्पर्धक हा मच्छीमार सहकारी संस्थेच्या सभासदाचा मुलगा किंवा मुलगी (पाल्य) असणे आवश्यक आहे. या स्पर्धकाने वरीलपैकी कोणत्याही एका विषयावर निबंध सादर करायचा आहे. निबंध मराठी भाषेत असून, तो ११०० ते १२०० शब्दांचा असावा. एका स्पर्धकाला केवळ एका विषयावर एकच निबंध सादर करता येईल. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. स्पर्धेतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना रोख पारितोषिकासह सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. या स्पर्धकांनी आपले निबंध १२ ऑक्टोबरपर्यंत प्राचार्य, मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, रत्नागिरी, या पत्त्यावर पाठवावेत, असे आवाहन तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. केतन चौधरी यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.