

आठ हजाराहून अधिक शेतकऱ्यांना फटका
कृषी विभागाकडून पीक पंचनामे; संगमेश्वर, राजापुरात सर्वाधिक
रत्नागिरी, ता. ६ ः जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाच्यावतीने खरिप हंगामातील पीक नुकसानीचे पंचनामे जलदगतीने सुरू आहेत. प्राप्त झालेल्या ताज्या अहवालानुसार, जिल्ह्यातील ९ तालुक्यांमधील एकूण २,६०१.०८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. यात ८,३४५ शेतकऱ्यांना फटका बसल्याचे समोर आले आहे.
पंचनाम्यांच्या या आकडेवारीवरून संगमेश्वर आणि राजापूर तालुक्यात नुकसानीची तीव्रता अधिक असल्याचे दिसून येत आहे. कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, संगमेश्वर तालुक्यात सर्वाधिक ५२५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे पंचनामे पूर्ण झाले असून, तब्बल २,०१५ शेतकरी यामुळे प्रभावित झाले आहेत. त्या पाठोपाठ राजापूर तालुक्यात ४६३.३५ हेक्टर क्षेत्रावरील १ हजार ४७८ शेतकऱ्यांचे नुकसान नोंदवले गेले आहे. रत्नागिरी तालुक्यात ३०६.८२ हेक्टर क्षेत्रावरील १,१६३ शेतकऱ्यांचा पंचनामा पूर्ण झाला आहे तर दुसरीकडे गुहागर, खेड आणि मंडणगड या तालुक्यांमध्ये बाधित क्षेत्राचे प्रमाण इतर तालुक्यांच्या तुलनेत कमी असले तरी तेथील शेतकरीवर्ग चिंतेत आहे. पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, सर्व अहवाल एकत्रित झाल्यानंतर बाधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर शासकीय भरपाई मिळवून देण्यासाठी कृषी विभाग आणि महसूल प्रशासन प्रयत्नशील आहे.
------
चौकट १
68186
जिल्ह्यातील पंचनाम्यांची आकडेवारी अशी
तालुका बाधित क्षेत्र (हेक्टर) शेतकरी संख्या
* रत्नागिरी * ३०६.८२ * १,१६३
* राजापूर * ४६३.३५ * १,४७८
* संगमेश्वर * ५२५.०० * २,०१५
* लांजा * २०२.२४ * ५९८
* चिपळूण * २८०.५० * ७५८
* गुहागर * १५२.३५ * ७५५
* खेड * १७०.४५ * ५६०
* दापोली * ३२५.१० * ५५८
* मंडणगड * १७५.२७ * ४६०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.