शासकीय तंत्रनिकेतन-एकता चा सामंजस्य करार

शासकीय तंत्रनिकेतन-एकता चा सामंजस्य करार
Published on: 

rat७p१.jpg-
26O68325
रत्नागिरी ः एकता रत्नागिरी जिल्हा टू व्हिलर मेकॅनिक, तांत्रिक प्रशिक्षण व कौशल्य विकास असोसिएशन यांच्यात सामंजस्य करारावेळी उपस्थित प्राचार्य डॉ. डोईफोडे आणि अध्यक्ष फिय्याज खतीब व मेकॅनिक.
---
विद्यार्थ्यांना मिळणार मेकॅनिक क्षेत्राचा अनुभव
‘तंत्रनिकेतन-एकता’चा सामंजस्य करार; ज्ञानाची देवाणघेवाण होणार

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ : शासकीय तंत्रनिकेतन, रत्नागिरी आणि एकता रत्नागिरी जिल्हा टू व्हिलर मेकॅनिक, तांत्रिक प्रशिक्षण व कौशल्य विकास असोसिएशन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या करारामुळे तांत्रिक शिक्षण आणि मेकॅनिक क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव यांची सांगड घालण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
शासकीय तंत्रनिकेतन, रत्नागिरी येथे झालेल्या कार्यक्रमात प्राचार्य डॉ. रा. ल. डोईफोडे आणि एकता रत्नागिरी जिल्हा टू व्हिलर मेकॅनिक असोसिएशनचे अध्यक्ष फैय्याज खतीब यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या करारांतर्गत आधुनिक टू व्हिलर तंत्रज्ञान, वाहन निदान प्रणाली, नवीन तांत्रिक पद्धती, कार्यशाळा प्रशिक्षण, कौशल्यविकास तसेच तांत्रिक ज्ञानाची देवाणघेवाण आदी क्षेत्रांत भविष्यात विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. तांत्रिक शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि प्रत्यक्ष व्यवसायात कार्यरत असलेले मेकॅनिक यांना एकमेकांच्या ज्ञान व अनुभवाचा लाभ मिळावा, हा याचा प्रमुख उद्देश आहे. जिल्ह्यातील टू व्हिलर मेकॅनिक बांधवांना संघटित करून त्यांच्या तांत्रिक ज्ञानात वाढ करणे, आधुनिक वाहन तंत्रज्ञानाशी त्यांची सांगड घालणे, प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे आणि मेकॅनिक व्यवसायाला अधिक कौशल्याधारित व व्यावसायिक स्वरूप देण्यासाठी ‘एकता’ असोसिएशनकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत.
या कार्याला शासकीय तंत्रनिकेतनसारख्या तांत्रिक शिक्षणसंस्थेची साथ मिळाल्याने मेकॅनिक कौशल्यविकासाला संस्थात्मक पाठबळ मिळणार आहे. या कार्यक्रमाला शासकीय तंत्रनिकेतनचे शैक्षणिक समन्वयक सुतवणे, अधिव्याख्याता खर्जुले, शेख, अवधूत देवकर, सुरेश बिरंबोळे तर एकता असोसिएशनचे सचिव धनंजय कदम, सहसचिव प्रदीप रेवाळे, महाराष्ट्र राज्य मेकॅनिक फेडरेशनचे संपर्कप्रमुख गणेश शेंडे, दिलीप शिंदे, मयुरेश यादव, पावस विभागाचे अध्यक्ष महेश पालकर, ज्येष्ठ मेकॅनिक प्रमोद (बावा) शिवलकर, जितेंद्र भुते आदी उपस्थित होते.
------
कौशल्य, तंत्रज्ञान अन् अनुभव यांची त्रिसूत्री
शासकीय तंत्रनिकेतनचे तांत्रिक ज्ञान, मेकॅनिक बांधवांचा प्रत्यक्ष अनुभव आणि आधुनिक वाहन तंत्रज्ञान यांचा समन्वय साधून सक्षम व कुशल मेकॅनिक घडवण्याच्यादृष्टीने हा करार महत्त्वपूर्ण ठरणार आहे. भविष्यात प्रशिक्षण शिबिरे, कार्यशाळा आणि विविध तांत्रिक उपक्रमांच्या माध्यमातून या सहकार्याला व्यापक स्वरूप देण्याचा मार्ग या करारामुळे खुला झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com