दळवटणेत सेवा संकल्प अभियान उत्साहात

दळवटणेत सेवा संकल्प अभियान उत्साहात
Published on: 

- rat७p२.jpg -
26O68326
चिपळूण - सेवासंकल्प अभियान व राष्ट्रीय पोषणमाह कार्यक्रमास उपस्थित महिला.

सेवासंकल्प अभियान
दळवटणेत उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ७ ः एकात्मिक बालविकास सेवा योजना, चिपळूण अंतर्गत दळवटणे येथे ९ वा राष्ट्रीय पोषणमाह व सेवासंकल्प अभियान कार्यक्रमात विविध शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने अभियान राबवण्यात आले.
या वेळी जिल्हा परिषद सदस्य दीप्ती महाडिक व पंचायत समिती सदस्य मेघा इंगावले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. अंगणवाडी पर्यवेक्षिका मनीषा चिपळूणकर यांनी महिला व बालविकास विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या ‘लेक लाडकी योजना’, ‘प्रधानमंत्री मातृवंदन योजना’ तसेच ‘बेबीकेअर कीट वाटप’ आदी योजनांची माहिती दिली. पात्र लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा यासाठी मार्गदर्शनही केले. माझी कन्या भाग्यश्री, लेक लाडकी योजना, प्रधानमंत्री मातृवंदन योजना या योजनेच्या लाभार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. मुलीचा जन्म झालेल्या मातांचा आशीर्वादाचा दिवा देऊन सत्कार करण्यात आला. शिक्षणविस्तार अधिकारी तथा प्रशासक देसाई यांनी महिलांना व पालकांना पौष्टिक आहाराबाबत मार्गदर्शन केले. प्राथमिक आरोग्यकेंद्र अडरे आरोग्यसेविका सावंत यांनी महिलांना विविध आरोग्यविषयी लाभांची व किशोर मुलींचे आरोग्य व पोषणबाबत माहिती दिली.
महिला व बालकांच्या उत्तम आरोग्यासाठी पोषणयुक्त व सकस आहाराचे महत्त्व या वेळी अधोरेखित करण्यात आले. जनजागृतीसाठी पोषक तृणधान्ये व विविध भाज्यांपासून तयार केलेल्या आकर्षक पाककृतींचे प्रदर्शन भरवण्यात आले. पोषणविषयक आहार प्रदर्शन व रांगोळी प्रदर्शन आणि जनजागृतीपर गीतांचे सादरीकरण करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com