

- rat८p६.jpg-
26O68545
खेड ः येथील तळे सेकंडरी स्कूलमध्ये आयोजित कार्यक्रमात पोवाडा सादर करताना संस्थांचे सचिव.
---
पोवाड्यातून व्यसनमुक्तीचा जागर
तळे स्कूलमध्ये मेळावा; सहाय्यक निबंधकांचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ८ : विद्यार्थीदशेतच योग्य संस्कार आणि निरोगी जीवनशैलीची सवय लागावी, या उद्देशाने तळे सेकंडरी स्कूलमध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘व्यसन प्रतिबंध जनजागृती मेळावा’ घेण्यात आला.
साहाय्यक निबंधक (सहकारी संस्था, खेड) आणि तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात गुणवंत सोसायट्यांच्या सचिवांनी शाहिरी ढंगात पोवाडे सादर करत व्यसनाचे घातक दुष्परिणाम मांडले. या सादरीकरणाने विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर राहण्याचा संदेश दिला. आयुष आणि योगा क्लिनिकचे डॉ. पाटील यांनी मोबाईलचा अतिवापर, ऑनलाईन गेम्सचे व्यसन, जंकफूड व पाकीटबंद अन्नामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती देऊन संतुलित जीवनशैलीचे महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमात मान्यवरांना रोपे भेट देऊन हरित वसुंधरेचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमानंतर ज्युनिअर कॉलेजच्या परिसरात या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. साहाय्यक निबंधकांनी विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थांना सामूहिक ‘व्यसन प्रतिबंध शपथ’ दिली. या वेळी तळे गावचे सरपंच, शाळेचे उपाध्यक्ष, मुख्याध्यापक, शिक्षक, विविध संस्थांचे अध्यक्ष व सचिव उपस्थित होते.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.