

Rat8p13.jpg
68586
मंडणगड : विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. संजयकुमार इंगोले.
----------
अभिजात मराठी भाषा टिकवण्याची जबाबदारी सर्वांची
प्रा. संजयकुमार इंगोले ः मुंडे महाविद्यालयात अभिजात मराठी भाषा दिन
मंडणगड, ता. ९ : अभिजात मराठी भाषा टिकवणे आणि तिचा विकास करणे, ही केवळ शासनाची किंवा साहित्यिकांची जबाबदारी नसून आपल्या सर्वांची आहे. मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा आणि अस्मिता यांची ओळख आहे. त्यामुळे मराठी भाषेचा दैनंदिन व्यवहारातील वापर, संशोधन आणि ग्रंथनिर्मितीला चालना देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मराठी विभागप्रमुख प्रा. संजयकुमार इंगोले यांनी केले.
मंडणगड येथील लोकनेते गोपीनाथ मुंडे महाविद्यालयात मराठी भाषा विभाग आणि मराठी वाङ्मय मंडळाच्यावतीने ‘अभिजात मराठी भाषा दिना’निमित्त ‘अभिजात मराठी भाषेचा विकास’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. या वेळी प्रा. इंगोले बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर होते.
प्रा. इंगोले म्हणाले, ‘कोणत्याही भाषेचे भवितव्य त्या भाषेचा प्रत्यक्ष व्यवहारातील वापर, संशोधन, ग्रंथनिर्मिती आणि ती भाषा बोलणाऱ्या लोकांचा स्वभाषेकडे पाहण्याचा दृष्टिकोन यावर अवलंबून असते. मराठी भाषेचा आणि मराठी संस्कृतीचा विकास आपल्या सर्वांच्या सहकार्यातून होणे आवश्यक आहे. या वेळी उपप्राचार्य डॉ. विष्णू जायभाये, डॉ. संदीप निर्वाण, डॉ. महेश कुलकर्णी, प्रा. वैभवी जोशी, ग्रंथपाल डॉ. दगडू जगताप आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.