शाळा दुरूस्तीचा निधी थेट देणार

शाळा दुरूस्तीचा निधी थेट देणार
Published on: 

rat8p29.jpg-
68651
रत्नागिरी : चला शाळेत जाऊया अभियानाअंतर्गत आयोजित कार्यक्रमात शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. सोबत अस्मिता केंद्रे, आमदार शेखर निकम, वैदेही रानडे.
--------

शाळा दुरूस्तीचा निधी थेट देणार
मंत्री दादा भुसेः देशभक्तीपर गीतांवर आधारित कवायत उपक्रम
रत्नागिरी, ता. ९ : शाळांच्या किरकोळ दुरूस्तीसाठी, रंगरंगोटीसाठी शासकीय लालफितीच्या कारभारात वेळ जाऊ नये म्हणून शाळा दुरूस्तीचा निधी थेट मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या संयुक्त खात्यावर वर्ग करण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल, अशी घोषणा शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी येथे केली. जिल्हा नियोजन समिती सभागृहात आज शालेय शिक्षणविभागातर्फे चला शाळेत जाऊया अभियान अंमलबजावणी बैठकीत ते बोलत होते.
ते म्हणाले, शिक्षण हे केवळ पदवीपुरते मर्यादित न राहता ते आनंददायी, भाकरी देणारे आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रखर राष्ट्रभक्ती निर्माण करणारे असावे. दर शनिवारी देशभक्तीपर गीतांवर आधारित कवायत हा आनंददायी उपक्रम सुरू केला आहे. शाळा बंद करणे हा शासनाचा हेतू नाही; उलट दर्जेदार शिक्षण देऊन या शाळांमधील पटसंख्या वाढवणे, ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.
शाळा मोठी असो किंवा एखाद्या झाडाखाली भरलेली, तिच्यात सकारात्मक वातावरण निर्माण करून तिचा संपूर्ण कायापालट करण्याचे सामर्थ्य केवळ शिक्षकांच्या हातात असते, असे मनोगत जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले. शिक्षकांच्या प्रयत्नांमुळेच शाळेची गुणवत्ता सुधारू शकते, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला. जिल्ह्यातील शाळांमधील जुन्या किंवा वापरात नसलेल्या खोल्यांचे रूपांतर सीएसआर निधीच्या माध्यमातून सुसज्ज ग्रंथालये आणि एआय तंत्रज्ञानयुक्त अध्ययन केंद्रांमध्ये केले जाईल. शाळांमध्ये पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, संरक्षक भिंत आणि सीसीटीव्ही यांसारख्या आवश्यक पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी डीपीडीसीच्या माध्यमातून सर्वंकष नियोजन केले जात आहे. विद्यार्थ्यांच्या क्रीडागुणांना वाव देण्यासाठी जिल्ह्यात क्रीडांगणे व क्रीडा प्रबोधिनी उभारण्याबाबतही विचार सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. शिष्यवृत्ती परीक्षेत प्रावीण्य मिळवलेल्या तसेच खेळाडू विद्यार्थी, विद्यार्थिनी, आयडॉल शिक्षक, शिक्षकांचाही सत्कार करण्यात आला.

चौकट
आरोग्यपत्रिका देणार
येत्या काळात विद्यार्थ्यांची सखोल आरोग्य तपासणी करून त्यांना ‘आरोग्यपत्रिका’ (हेल्थ कार्ड) दिली जाईल. क्रीडागुणांना वाव देण्यासाठी ‘आनंद गुरूकुल क्रीडा प्रबोधिनी’ आणि हुशार विद्यार्थ्यांसाठी ‘सुपर १००’ सारख्या योजना प्रभावीपणे राबवल्या जात आहेत, असे दादा भुसे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com