

कलांगणच्या वक्तृत्व स्पर्धेत
पैसाफंडची क्रिशा इंद्रानी प्रथम
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ९ ः कलांगण संगमेश्वरतर्फे आंतरशालेय तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत पैसाफंड इंग्लिश स्कूलच्या क्रिशा इंद्रानी हिने प्रथम क्रमांक पटकावला.
बुरंबी येथील दादासाहेब सरफरे विद्यालयात पार पडलेल्या स्पर्धेत तालुक्यातील 14 शाळांतील 24 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. चंद्रकांत पवार आणि संगमेश्वरमधील प्रसिद्ध डॉक्टर आणि ज्येष्ठ अभिनेते डॉ. भगवान नारकर यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.
स्पर्धेच्या उद्घाटन आणि बक्षीस वितरणास स्पर्धा समन्वयक, सुप्रसिद्ध अभिनेत्री संपदा जोगळेकर-कुळकर्णी, बुरंबी शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश वीरकर, कलांगणचे अध्यक्ष अमोल लोध, दोन्ही परीक्षक, सुप्रसिद्ध व्याख्याते श्रीनिवास पेंडसे आदी मान्यवर उपस्थित होते. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली वाहिली गेली. क्रिशा हिने प्रथम, माखजन इंग्लिश स्कूलच्या कल्याणी साठे हिने द्वितीय तर मीनाताई ठाकरे विद्यालयाच्या वेदांती राव हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला. विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह, पुस्तके आणि रोख रक्कम देण्यात आली. यावर्षी प्रथम क्रमांकप्राप्त विद्यार्थिनीचे मार्गदर्शक शिक्षक पैसाफंड स्कूलचे विनोद कृष्णा ढोर्लेकर यांना रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. सर्व सहभागी, विजेते स्पर्धक आणि त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांस प्रशस्तीपत्र देण्यात आले. निबंध कानिटकर यांनी स्पर्धेचे सूत्रसंचालन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.