

वाचलेल्या पुस्तकावर समीक्षा लिहा
डॉ. नरेंद्र तेंडोलकर ः आठल्ये-सप्रे महाविद्यालयात पुस्तक प्रदर्शन
सकाळ वृत्तसेवा
देवरूख, ता. ९ ः ‘‘केवळ वाचन पुरेसे नसून वाचलेल्या पुस्तकावर चिंतन करून समीक्षा लिहिणे आणि लेखकाच्या विचारांवर स्वतंत्रपणे मत मांडणे आवश्यक आहे,’’ असे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी सांगितले.
देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे स्वायत्त महाविद्यालयात आयोजित ‘आरोग्य व योगा’ विषयावर आधारित पुस्तक प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. महाविद्यालयातील स्व. आबासाहेब व कमलाबाई सरदेशपांडे ग्रंथालय आणि वाणिज्य विभागाच्यावतीने हे प्रदर्शन भरवण्यात आले असून, त्याचे उद्घाटन प्राचार्य डॉ. तेंडोलकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ग्रंथपाल प्रा. डॉ. सुभाष मायंगडे उपस्थित होते. या प्रदर्शनात योग, प्राणायाम, व्यायाम, आहारशास्त्र, मानसिक व शारीरिक आरोग्य, तणाव व्यवस्थापन, जीवनशैली आणि व्यक्तिमत्त्व विकाससारख्या विविध विषयांवरील दर्जेदार पुस्तकांचा समावेश आहे. या प्रसंगी तेंडोलकर यांनी विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात वाचनाला महत्त्व देण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची सवय रूजण्यासोबतच आरोग्यदायी जीवनशैली, योग, व्यायाम आणि मानसिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने याचे आयोजन केले आहे.
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना विविध विषयांची पुस्तके सहज उपलब्ध व्हावीत यासाठी ग्रंथालयातर्फे सातत्याने प्रयत्न केले जातात. आगामी काळात दरमहा उद्योजकता, स्पर्धा परीक्षा, चरित्रे, साहित्य, पर्यावरण आणि खेळ अशा विविध विषयांवर प्रदर्शने आयोजित केली जातील, अशी माहिती ग्रंथपाल प्रा. डॉ. सुभाष मायंगडे यांनी दिली.
चौकट
प्रदर्शन १० ऑक्टोबरपर्यंत खुले
हे प्रदर्शन ८ ते १० ऑक्टोबर कालावधीत महाविद्यालयाच्या ग्रंथालयात विद्यार्थी व शिक्षकांसाठी खुले राहणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती अधिक विकसित होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.