

rat९p१०.jpg-
68797
राजापूर ः नायब तहसीलदार सायली गुरव यांच्याकडे निवेदन देताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जमीरखलिफे आणि पदाधिकारी.
-----------------
मुख्य निवडणूक आयुक्तांना
बडतर्फ करून अटक करा
मतचोरीचा आरोप; जिल्हा काँग्रेसची राष्ट्रपतींकडे मागणी
राजापूर, ता. ९ ः मतदारांची नावे वगळणे आणि निवडणूक प्रक्रियेत अनियमितता होत असल्याचा आरोप करत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून बडतर्फ करून अटक करावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेसच्यावतीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाध्यक्ष ॲड. जमिर खलिफे यांच्या नेतृत्वाखालील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तहसीलदारांना दिले.
निवडणूक आयोगाने स्वतंत्र आणि निष्पक्षपणे काम करणे अपेक्षित असताना आयोगाचा कारभार पारदर्शक नसल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. आयोग सत्ताधारी भाजपला अनुचित लाभ मिळवून देत असल्याचा दावाही निवेदनात करण्यात आला आहे. एसआयआर प्रक्रियेद्वारे मोठ्या प्रमाणात मतदारांची नावे वगळली जात असल्याने लोकशाही आणि संविधानासमोर धोका निर्माण झाल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. पश्चिम बंगाल आणि बिहारमधील मतदारांची नावे वगळल्याचा तसेच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवेळी ४७ लाख बोगस मतदार वाढवल्याचा आरोपही निवेदनातून केला आहे. निवडणूक प्रक्रियेतील कथित गैरप्रकारांची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. या वेळी तालुकाध्यक्ष सतीश बंडबे, शहराध्यक्ष आजिम जैतापकर, नगरसेवक सिद्धांत जाधव उपस्थित होते.
चौकट
राहूल गांधींना झालेल्या धक्काबुक्कीचा निषेध
निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना भेटावयास जाणाऱ्या सर्व खासदारांना तसेच आमचे नेते संसदेतील विरोधी पक्ष राहुल गांधी आणि खासदार प्रियांका गांधी यांना जबरदस्ती करून धक्काबुक्की केली. त्याबद्दल ८ ऑक्टोबर २०२६ हा काळा दिवस म्हणून जाहीर करून जिल्हा काँग्रेसच्यावतीने जाहीर निषेध करत असल्याचेही या निवेदनात नमूद केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.