

माशांपासून पौष्टिक पदार्थांची निर्मिती
कोळंबी पफ, फिश कटलेटसह नावीन्यपूर्ण पदार्थांचे प्रशिक्षण
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० : माशांपासून विविध मूल्यवर्धित व पौष्टिक खाद्यपदार्थ तयार करणे, त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव येथे ‘आधुनिक मूल्यवर्धित पदार्थनिर्मिती प्रशिक्षण कार्यशाळे’चे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत कोळंबी पफ, कोळंबी पराठा, समुद्री शेवाळयुक्त कुकीज आणि फिश रशियन कटलेटसारख्या नावीन्यपूर्ण पदार्थनिर्मितीचे प्रशिक्षण देण्यात आले.
कोकण कृषी विद्यापीठांतर्गत मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव आणि सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झाडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने एनसीडीसी-सीबीबीओ-एफएफपीओ-रायगड प्रकल्पांतर्गत ‘सेवासंकल्प अभियान’ राबवण्यात येत आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून २ ऑक्टोबरला मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनच्या परिषद दालनात ही कार्यशाळा घेण्यात आली. या वेळी मुंबई येथील मुख्य वनसंरक्षक (कांदळवन कक्ष) एन. आर. प्रवीण, रत्नागिरीचे वनक्षेत्रपाल प्रशांत निकाळजे, अलिबागच्या साहाय्यक वनसंरक्षक प्रियांका पाटील, कांदळवन कक्षाचे विक्रांत यादव, दशरथ तसेच कांदळवन कक्षाचे सदस्य फहाद जमादार उपस्थित होते. कार्यशाळेत सुमारे ६० प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला. यामध्ये करंजा हार्बर मत्स्य शेतकरी उत्पादक संस्था, रायगडचे १२ संचालक मंडळ सदस्य आणि शिरगाव येथील क्रांती महिला प्रभागातील महिला सदस्यांचा समावेश होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.