

rat११p६.jpg-
69134
चिपळूण ः वालोपे येथे आयोजित कार्यक्रमात सहभागी अंगणवाडी सेविका आणि महिला.
भारुड, पोषण आरती मधून आरोग्याचा संदेश
वालोपेत अनोखा उपक्रम ; अंगणवाडी सेविकांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ११ : एकात्मिक बालविकास सेवा योजना चिपळूण-१, बीट दादर-२ अंतर्गत वालोपे येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत आयोजित कार्यक्रमात आरोग्य, सुदृढ पोषण, स्वच्छता आणि महिला सक्षमीकरणाचा जागर करण्यात आला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून पौष्टिक पाककृती स्पर्धा व आकर्षक रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन केले होते. या वेळी अंगणवाडी सेविकांनी पारंपरिक लोककला भारुड आणि सुश्राव्य ‘पोषण आरती’ सादर करत आरोग्याचा संदेश मनोरंजक व प्रभावी पद्धतीने उपस्थितांपर्यंत पोहोचवला.
कार्यक्रमा दरम्यान आयोजित विशेष सोहळ्यात मुलगी जन्माचे स्वागत करत कन्यारत्न प्राप्त झालेल्या मातांना सन्मानपूर्वक ‘आशीर्वादाचा दिवा’ देण्यात आला. तसेच शासनाच्या ‘लेक लाडकी योजना’ आणि ‘प्रधानमंत्री मातृवंदना योजना’ या महत्त्वाकांक्षी योजनांच्या लाभार्थी महिलांचा विशेष सत्कार करण्यात आला. बालकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या संदेशासह सर्व चिमुकल्यांना फळवाटप करण्यात आले. ग्रामपंचायत वालोपे यांच्या वतीने अंगणवाडी सेविका व मदतनिस यांच्या अविरत सेवेचा गौरव करत त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास माजी सरपंच अनिशा काजवे, माजी उपसरपंच समिधा कदम, अंगणवाडी पर्यवेक्षिका मनीषा चिपळूणकर, अडरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सहाय्यक सावंत मॅडम, सीएचओ श्रीमती शेख, पोलीस पाटील माधवी जाधव, बचत गटाच्या सीआरपी रसिका आयरे, स्वाती सोलकर, ग्रामपंचायत अधिकारी विश्वास पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.