चिमुकल्यांनी लावलेल्या भक्तीच्या रोपट्याचा वटवृक्ष...

चिमुकल्यांनी लावलेल्या भक्तीच्या रोपट्याचा वटवृक्ष...
Published on: 

rat१२p२.jpg-
26O69373
रत्नागिरी ः भोके-मठवाडी येथील बालमित्रमंडळाची पर्यावरणपूरक नवरात्रोत्सवातील दुर्गादेवीची सुबक मूर्ती.
---
बालमित्रमंडळाचा १५ वर्षांचा उत्सव

भोकेतील मठवाडीत पर्यावरणपूरक नवरात्रोत्सव

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ ः शहरानजीकच्या भोके गावातील मठवाडी येथील चिमुकल्यांनी २०११ मध्ये सुरू केलेल्या दुर्गादेवी पूजेच्या उपक्रमाने यंदा १५ वर्षांचा यशस्वी टप्पा गाठला आहे. या महोत्सवाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे फटाके, लाउडस्पीकरला फाटा देत पर्यावरणपूरकतेवर भर दिला जात आहे.
२०११मध्ये वाडीतील काही मुलांनी एकत्र येत मातीची छोटी मूर्ती साकारून नऊ दिवस मनोभावे पूजा करण्यास सुरुवात केली होती. मुलांची ही श्रद्धा आणि उत्साह पाहून वाडीतील ज्येष्ठांनी त्यांना प्रोत्साहन दिले आणि त्यातूनच ‘बालमित्रमंडळा’ची स्थापना झाली. सुरुवातीला अत्यंत साध्या रूपात सुरू झालेल्या या सोहळ्याला आज संपूर्ण वाडीचे पाठबळ लाभले असून, उत्सवाचे स्वरूप व्यापक झाले आहे. दिवसभर शेतात कष्ट करणाऱ्या ग्रामस्थांसाठी हा उत्सव केवळ धार्मिक सोहळा न राहता आनंद, सांस्कृतिक परंपरा आणि सामाजिक एकोपा जपण्याचे मुख्य माध्यम बनला आहे. सध्या बालमित्रमंडळाचे अध्यक्ष म्हणून राजाराम मायंगडे आणि उपाध्यक्ष म्हणून भिकाजी मायंगडे काम पाहत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com