

-rat१२p४२.jpg-
26O69513
पावस ः गोळप येथे बंधारा बांधताना ग्रामस्थ.
----
नवेदरवाडीत जलसंधारणाचा जागर
श्रमदानातून बंधारा; जनसेवा अन् बचतगटाचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. १३ ः गोळप येथील जनसेवा सामाजिक मंडळ आणि नवेदरवाडी महिला बचतगटाच्या संयुक्त विद्यमाने ग्रामस्थांच्या सहकार्यातून नवेदरवाडी येथे नदीवर श्रमदानातून बंधारा बांधण्यात आला. सकाळी ६.३० ते ८.३० या वेळेत हा उपक्रम राबवण्यात आला. यंदा कमी पाऊस झाल्याने संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी या वर्षातील पहिला बंधारा उभारण्यात आला असून, यापुढेही असे बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट आहे.
मंडळाचे अध्यक्ष ॲड. अविनाश काळे म्हणाले, ‘‘यंदा पाऊस कमी झाल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नद्यांमधून वाहून जाणारे पाणी शक्य त्या ठिकाणी अडवून जमिनीत जिरवणे आवश्यक आहे. महिला बचतगटाच्या अध्यक्षा वर्षा गोरिवले यांनी या बंधाऱ्यामुळे वाडीतील नागरिक आणि जनावरांना पाणी उपलब्ध होण्यास मदत होईल, तसेच परिसरातील विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होण्यास हातभार लागेल, असे सांगितले.’’ महिला बचतगटांनीही अशा सामाजिक उपक्रमांत पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. बंधाऱ्यासाठी आवश्यक प्लास्टिक आणि अल्पोपाहाराची व्यवस्था देवरूखकर कुटुंबीयांनी केली. या वेळी मंडळाचे अध्यक्ष ॲड. अविनाश काळे, सचिव समित घुडे, ग्रामपंचायत अधिकारी सुरेश भगत, सुभाष व संतोष देवरूखकर, विवेक देवरूखकर, विलास गोरिवले, दीपक सनगरे, लक्ष्मण आग्रे, विराज जोशी यांच्यासह महिला बचतगटाच्या सदस्या आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.