आरोग्य शिबिरातून 1,242 नागरिकांना आरोग्य सेवा

आरोग्य शिबिरातून 1,242 नागरिकांना आरोग्य सेवा
Published on: 

- rat१३p१४.jpg-
26O69704
मंडणगड : सेवासंकल्प अभियानांतर्गत प्रमाणपत्र, दाखल्यांचे वितरण करताना पदाधिकारी, अधिकारीवर्ग.
----
मंडणगडमध्ये ‘सेवासंकल्पा’चा धडाका
शिबिरातून १,२४२ जणांना आरोग्यसेवा; महिला शेतकऱ्यांना प्रमाणपत्रे
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. १३ : शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत ‘सेवासंकल्प अभियाना’च्या माध्यमातून मंडणगड तहसील कार्यालयाच्यावतीने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहात विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. तालुक्यात राबवलेल्या ३८ आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून १ हजार २४२ नागरिकांना आरोग्यसेवा पुरवण्यात आली तसेच आयुष्मान भारतकार्डचे वितरण करण्यात आले.
विविध शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सुलभतेने पोहोचवणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश असून या शिबिरात नागरिकांना विविध दाखले, कृषी साहित्य आणि शासकीय योजनांच्या लाभांचे वितरण करण्यात आले. याबाबत तहसीलदार अक्षय ढाकणे यांनी अभियानांतर्गत तालुक्यात झालेल्या विविध कामांचा सविस्तर आढावा घेतला. या प्रसंगी तीन हजार ८०० महिला शेतकऱ्यांना शेतकरी प्रमाणपत्रे, ७० शेतकऱ्यांना कृषी अवजारे, १९० शेतकऱ्यांना काजू कलमे आणि ६१ शेतकऱ्यांना ‘पीएम किसान’ लाभ वितरित करण्यात आले. मंडळ स्तरावर सातबारा उतारे, फेरफार नोंदी आणि उत्पन्नाच्या दाखल्यांचे वितरण करण्यात आले. तसेच पाणंद रस्त्यांचे प्रश्न आणि लोकअदालतीच्या माध्यमातून अनेक प्रलंबित दावे मार्गी लावले गेले. तुळशी-लाटवण येथे दुग्धव्यवसाय व कुक्कुटपालन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. तसेच दिव्यांग लाभार्थ्यांना अनुदान व प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी सभापती प्रणाली चिले, जिल्हा परिषद सदस्य प्रताप घोसाळकर, उपसभापती दीपक मालुसरे, पंचायत समिती सदस्य अनिल रटाटे, दीप्ती घडशी, तालुका कृषी अधिकारी सोमनाथ अहिरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिषेक गावंडे, प्रशासकीय अधिकारी वामन मेंढे, उमेश म्हस्के, सुदर्शन खानविलकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सचिन गोवळकर यांनी सूत्रसंचालन केले.
---
साहित्याचे वितरण
शिबिरात ग्रामीण गृहनिर्माण विभाग, एकात्मिक बालविकास सेवा योजना, नगरपंचायत आणि महसूल विभागाच्यावतीने पात्र लाभार्थ्यांना बेबी केअर कीट, पॉवरटिलर, ब्रशकटर, फवारणी पंप आणि असेसमेंट दाखल्यांचे वाटप करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com