

Rat१३p८.jpg-
69685
मंडणगड ः टाकेडे येथे वनराई बंधारा बांधल्यानंतर साचलेले पाणी आणि ग्रामस्थ.
----------
श्रमदानातून टाकेडे येथे उभारले दोन वनराई बंधारे
ग्रामस्थांसह महिलांचा पुढाकार; पाणीटंचाईवर मात
मंडणगड, ता. १३ ः यंदा पावसाने दडी मारल्याने भविष्यात पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जलसंधारणाचे महत्त्व ओळखून मौजे टाकेडे येथे श्रमदानातून दोन वनराई बंधाऱ्यांची उभारणी करण्यात आली आहे. टाकेडे ग्रामविकास मंडळ ग्रामीण आणि उत्कर्ष महिला मंडळ, टाकेडे यांच्या संयुक्त पुढाकारातून पालघर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील हौदाचा ओहळ येथे हा उपक्रम राबवण्यात आला.
पावसाचे पाणी अडवून ते स्थानिक पातळीवर साठवता यावे आणि भविष्यात उद्भवणाऱ्या पाणीटंचाईच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी मदत व्हावी, या उद्देशाने दोन्ही बंधारे बांधण्यात आले. या बंधाऱ्यांमुळे पाण्याचा चांगला साठा निर्माण झाला असून, ग्रामस्थांच्या सामूहिक प्रयत्नांतून जलसंधारणाचे महत्त्वपूर्ण काम पूर्ण झाले आहे. या उपक्रमासाठी आवश्यक साहित्य ग्रुपग्रामपंचायत पालघरचे सचिव पालवे यांनी उपलब्ध करून दिले. तसेच मंडळाचे सदस्य रमेश चाळके यांनी स्वतःच्या नांगराच्या साहाय्याने जमीन नांगरून बंधाऱ्यांसाठी आवश्यक माती उपलब्ध करून दिली. त्यामुळे श्रमदानासोबतच स्थानिक साधनसामग्रीचा उपयोग करून हा उपक्रम यशस्वी करण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष अनंत शिंदे, उपाध्यक्ष एकनाथ चव्हाण, सचिव अनिल गणवे, माजी सभापती अमिता शिंदे, मंडळाचे सल्लागार सिताराम सुर्वे आणि ग्रामपंचायत सचिव पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम पूर्ण करण्यात आले. यासाठी गावातील बहुसंख्य ग्रामस्थांसह महिलांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
चौकट १
लोकसहभागातून जलसंधारणाचा संदेश
पाणीटंचाईसारख्या संभाव्य संकटावर मात करण्यासाठी केवळ शासकीय योजनांवर अवलंबून न राहता गावपातळीवर लोकसहभागातूनही प्रभावी उपाययोजना करता येतात, हे टाकेडे येथील उपक्रमातून दिसून आले आहे. पावसाचे पाणी अडवणे, त्याचा साठा वाढवणे आणि उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. टाकेडे ग्रामविकास मंडळ ग्रामीण आणि उत्कर्ष महिला मंडळाने राबवलेला हा उपक्रम इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरणारा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.