मत्स्यबीज केंद्रांसह गाळ उपशाचा पाठपुरावा

मत्स्यबीज केंद्रांसह गाळ उपशाचा पाठपुरावा
Published on: 

मत्स्यबीज केंद्रांसाठी जागांची चाचपणी
करंबवणे, पिंपळीखुर्दसाठी प्रस्ताव ; शेखर निकम यांचा पाठपुरावा
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १४ ः चिपळूण-संगमेश्वर मतदार संघातील मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासह चिपळूणचा पूरधोका कमी करण्यासाठी आमदार शेखर निकम यांनी मत्स्य व्यवसाय मंत्री नीतेश राणे यांच्याकडे तीन महत्त्वपूर्ण विषयांचा पाठपुरावा केला. करंबवणे व पिंपळीखुर्द येथे मत्स्यबीज केंद्र उभारणे आणि वाशिष्ठी नदीतील तिसऱ्या टप्प्यातील गाळ उपसा याबाबत बैठकीत चर्चा झाली. गाळ उपशासाठी आपत्कालीन निधीतून ड्रेजर खरेदी करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या.
करंबवणे येथे शासनाच्या नावे असलेल्या १३.८९८० हेक्टर जमिनीवर मत्स्यबीज केंद्र अथवा रोजगारपूरक प्रकल्प उभारण्याची शक्यता आमदार निकम यांनी मांडली. यापूर्वी केवळ दोन हेक्टर जागेचा विचार झाला होता. आता संपूर्ण जमिनीची पाहणी करून पाण्याची उपलब्धता आणि तांत्रिक व्यवहार्यता तपासण्याचे निर्देश मंत्र्यांनी दिले. पिंपळीखुर्द येथील गट क्र. २१ मधील महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अखत्यारितील सुमारे १० हेक्टर जागा मत्स्यबीज केंद्रासाठी हस्तांतरित करण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला. येथे वीज, बारमाही पाणी आणि जोडरस्त्याची सुविधा असून, पाणी परीक्षणातही जागा मत्स्यबीज उत्पादनासाठी योग्य असल्याचे नमूद आहे. जागा हस्तांतरणासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधून कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.
२०२१च्या महापुरानंतर चिपळूणचा पूरधोका कमी करण्यासाठी वाशिष्ठी नदीतील गाळ उपशाला महत्त्व आहे. गोवळकोट ते बहिरवलीदरम्यान तिसऱ्या टप्प्यात सुमारे ४२.७८ लाख घनमीटर गाळ उपसण्याचे नियोजन आहे. या कामासाठी आवश्यक सर्वेक्षण, परवानग्या, निधी आणि ड्रेजर खरेदीबाबत निकम यांनी मुद्दे मांडले. आपत्ती व्यवस्थापन निधीसह अन्य आर्थिक पर्याय तपासण्याची मागणीही त्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com