-मिळेल ते भात मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

-मिळेल ते भात मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
Published on: 

-rat१३p३२.jpg-
26O69819
पावस ः पावस परिसरात भातकापणीत मग्न महिला शेतकरी.
----
पावसाची धास्ती, कापणीची घाई
पावस पंचक्रोशीतील चित्र; भातपीक वाचवण्यासाठी शेतकरी शेतात
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. १४ ः गेल्या वर्षी कापणीच्या अंतिम टप्प्यात पावसाने घातलेल्या धुमाकुळामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले. यंदा पावसाळा लवकर थांबल्याने उभे पीक धोक्यात आले आहे. परतीच्या पावसाने पुन्हा दगा देण्याची भीती असल्याने पावस परिसरातील शेतकऱ्यांनी ‘मिळेल ते भात पदरात’ या निर्धाराने कापणीला वेग दिला आहे. नुकसानीचे पंचनामे सुरू असतानाच तयार झालेले पीक वाचवण्यासाठी शेतकरी शेतात उतरले आहेत.
गेल्या वर्षी पावस परिसरात सुमारे ७० टक्के भातकापणी पूर्ण झाल्यानंतर झालेल्या संततधार पावसाने उर्वरित पिकाचे मोठे नुकसान केले होते. या अनुभवातून धडा घेत यंदा शेतकरी अधिक सावध झाले आहेत.
यंदा मागील वर्षाच्या तुलनेत पाऊस कमी झाला. सुरुवातीला अवकाळी पाऊस झाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी पेरणी व लावणीची कामे उरकली; मात्र, त्यानंतर पावसाने वारंवार ओढ दिल्याने भातपिकाला पोषक वातावरण मिळाले नाही. अधूनमधून पडणाऱ्या सरींच्या आधारावर पीक तग धरून होते; परंतु पाऊस लवकर थांबल्याने पिकाच्या वाढीवर परिणाम झाला आहे. परतीच्या पावसाने पुन्हा नुकसान होण्याआधी भात कापणी पूर्ण करण्यासाठी परिसरात लगबग सुरू आहे. निसर्गाच्या लहरीपणाशी झुंज देताना मिळेल तेवढे उत्पन्न पदरात पाडून घेण्याची धडपड शेतकऱ्यांना करावी लागत आहे.
---
पंचनाम्यापेक्षा पीक वाचवण्यावर भर
शासनाकडून नुकसानीचे पंचनामे सुरू असले तरी भरपाई किती आणि कधी मिळणार, याची शाश्वती नाही. त्यामुळे मदतीच्या प्रतीक्षेत राहण्यापेक्षा हातात आलेले पीक वाचवण्यावर शेतकऱ्यांनी भर दिला आहे.
---
कोट
सध्या जी भातशेती तयार झाली आहे ती कोणत्याही स्थितीत असो, कापून त्यातून भात मिळवण्याच्या प्रयत्नात आहोत. परतीच्या पावसाची शाश्वती नसल्याने जे काही मिळेल ते आपले समजून कापणीत गुंतलो आहोत.
-अनुजा भरणकर, महिला शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com