मुलींचा संघ खो-खो स्पर्धेत विजयी

मुलींचा संघ खो-खो स्पर्धेत विजयी
Published on: 

rat१४p१९.jpg, rat१४p२०.jpg-
26O70003
लांजा ः तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत खो-खोमध्ये विजेतेपद पटकावलेले तळवडे विद्यालयाचा मुलींचा संघ.

खो-खोमध्ये ‘पेडणेकर’च्या मुलींचा संघ विजयी
लांजा ः लांजा तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत तळवडेच्या जगन्नाथ गंगाराम पेडणेकर विद्यालयाच्या १४ वर्षे मुलींच्या संघाने खो-खोमध्ये विजेतेपद पटकावत सलग दहा वर्षांची विजयाची परंपरा कायम राखली. जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय रत्नागिरी व पंचायत समिती शिक्षण विभाग लांजा यांच्या संयुक्त विद्यमाने लांजा तालुकास्तरीय १४ वर्षे वयोगट शालेय खो-खो स्पर्धा श्रीराम विद्यालय वेरवली येथे झाल्या. मुलींच्या संघाची कर्णधार आराध्या माने, पौर्णिमा दरडे, शीतल गुरव, सिद्धी इंगळे, आर्या टोळे, आराध्या करंबेळे यांनी उत्कृष्ट संरक्षण केले. त्यांना कल्याणी कांबळे, सार्थकी पांचाळ, ज्ञानेश्वरी शिंदे, पूर्वी दरडे, तन्वी नामये, दिव्या नामये, युक्ता तापेकर, श्रावणी पाल्ये, सानिया इंगळे यांनी उत्तम साथ दिली. मुलांच्या संघाचा कर्णधार आदित्य माटल, आयुष इंगळे, चिराग पाटोळे, देवांत दरडे, आदित्य नामये, उमेश इंगळे यांनी उत्कृष्ट संरक्षण केले.



खेड येथे आरोग्य विभागाची कार्यशाळा

खेड ः ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य सुधारण्यासह गावागावांत आरोग्यसुविधा प्रभावीपणे पोहोचवण्याच्या उद्देशाने राबवण्यात येणाऱ्या ‘माझं गाव आरोग्यसंपन्न गाव’ अभियानांतर्गत खेड तालुका आरोग्य विभागाच्यावतीने विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात ही कार्यशाळा उत्साहात झाली. या कार्यशाळेला पंचायत समितीच्या सभापती डॉ. अफिया पालेकर, कळंबणी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी सगरे, गटविकास अधिकारी विजय करपे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. खरटमोल तसेच अभियानाचे शासननियुक्त सदस्य चंद्रकांत बनकर यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


‘कन्या कल्याण’ योजनेतून आर्थिक आधार
खेड : ‘मुलगी वाचवा, मुलगी शिकवा’ अभियानाला बळ देण्यासह लोकसंख्या नियंत्रणाला प्रोत्साहन देण्यासाठी खेड तालुक्यात आरोग्यविभागामार्फत सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजना राबवण्यात येत आहे. या योजनेंतर्गत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या पात्र दाम्पत्यांना मुलींच्या नावे आर्थिक प्रोत्साहन दिले जात आहे. या योजनेंतर्गत एका मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या पात्र दाम्पत्याच्या मुलीच्या नावे ३१ हजार रुपये जमा केले जातात तर दोन मुलींनंतर शस्त्रक्रिया केल्यास दोन्ही मुलींच्या नावे प्रत्येकी २५ हजार रुपये जमा करून आर्थिक प्रोत्साहन दिले जाते. ही रक्कम राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राच्या स्वरूपात अथवा थेट बँक हस्तांतरणाद्वारे दिली जाते. पात्र दाम्पत्यांनी योजनेच्या लाभासाठी संबंधित आरोग्यकेंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com