

rat१६p३.jpg-
P26O70486
रत्नागिरी- तालुक्यातील चवे येथे विद्यार्थी, ग्रामस्थांच्या श्रमदानातून घालण्यात आलेला बंधारा.
- ratchl१६१.jpg
P26O70506
चिपळूण ः मुंढेतर्फे चिपळूण येथे उभारण्यात आलेला कच्चा बंधारा.
- rat१६p७.jpg-
26O70490
देवरूख ः आंबव येथे उभारलेला बंधारा.
rat१६p१६.jpg-
26O70502
संगमेश्वर ः गोळवलीत बांधलेल्या बंधाऱ्यात साचलेले पाणी.
----
लोकसहभागातून जलसंधारणाचा एल्गार
‘मिशन बंधारे मोहीमे’ला वेग; रत्नागिरी, चिपळूण, संगमेश्वरात उभारले बंधारे
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १६ : संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि भूजलपातळी वाढवण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात ‘मिशन बंधारे’ मोहीम व्यापक स्वरूपात राबवली जात आहे. प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांच्या पुढाकारातून चिपळूण व संगमेश्वर तालुक्यांतील विविध गावांमध्ये श्रमदानातून अनेक कच्चे व वनराई बंधारे उभारण्यात आले आहेत. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही संकल्पना प्रत्यक्ष कृतीत आणत ग्रामस्थांनी जलसंधारणाचा प्रेरणादायी आदर्श जिल्हाभरात निर्माण केला आहे.
पालकमंत्री डॉ. उदय सामंत, जिल्हाधिकारी मनुज जिंदल आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी गावपातळीवर बंधारे उभारण्यासाठी आवाहन केले आहे. त्याला प्रतिसाद मिळत असून रत्नागिरी तालुक्यातील कुर्दे, चांदोर, भगवतीनगर आणि चवे या चार ठिकाणी एकाच दिवसात चार वनराई बंधारे बांधण्यात आले. प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कुर्दे गावात वनराई बंधारा उभारला तर कुर्दे येथील बंधारा बांधणीसाठी महसूल अधिकारी व कर्मचारी ग्रामस्थांसोबत सहभागी झाले आहेत. तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनीही त्यात सहभाग घेतला.
* मुंढेतर्फे चिपळुणात श्रमदान
चिपळूण तालुक्याचा दुष्काळी तालुक्यात समावेश नसला तरीही पाऊस कमी झाल्यामुळे पाणीटंचाईचे सावट कायम आहे. त्यासाठी तालुक्यातील मुंढेतर्फे चिपळूण ग्रामपंचायतीने मिशन बंधारे मोहीम राबवली आहे. गावातील वरचीवाडी येथे श्रमदानातून बंधारे बांधण्यात आले. ग्रामस्थांनी लोकसहभागातून दगड, माती आणि प्लास्टिकचा वापर करून मजबूत बंधारे उभारले आहेत. या उपक्रमासाठी सभापती सूर्यकांत खेतले यांचे सहकार्य लाभले. या वेळी जिल्हा परिषद सदस्या नेहा रहाटे, ठाकरे सेनेचे तालुकाप्रमुख बळीराम गुजर उपस्थित होते.
* आंबवमध्ये श्रमदानासाठी एकवटले गाव
संगमेश्वर तालुक्यातील आंबव ग्रामस्थांनी एकजुटीने गावातून वाहणाऱ्या वहाळावर श्रमदानातून १० बंधारे उभारले. गावकऱ्यांच्या या सामूहिक प्रयत्नातून जलसंधारणाचा प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे. यासाठी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद अधटराव यांनी पुढाकार घेतला. आंबव ग्रामपंचायतीच्यावतीने बंधारे बांधण्यासाठी प्लास्टिक मोफत उपलब्ध करून दिले. उपक्रमास पंचायत समितीचे उपसभापती प्रफुल्लचंद्र बाईत, गटविकास अधिकारी लोकरे, सरपंच माधवी प्रमोद अधटराव, उपसरपंच बाळा माने आणि समीर चाळके यांनी भेट दिली.
* गोळवलीत १० विजय बंधाऱ्यांची उभारणी
संगमेश्वर तालुक्यातील गोळवली ग्रामपंचायतीच्यावतीने ‘मिशन बंधारे’ उपक्रमांतर्गत गावात दहा विजय बंधाऱ्यांची उभारणी करण्यात आली. ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून आणि ग्रामस्थांच्या सहभागातून जलसंधारणाच्या कामाला चालना मिळाली आहे. भूजल पातळी टिकवून ठेवण्यासाठीही हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे. या उपक्रमात ग्रामपंचायत अधिकारी सुनील गुरव, कोतवाल जगदीश गमले, पोलिस पाटील आप्पा पाध्ये, नंदकुमार आमकर, बाबू आमकर, संतोष आमकर, अमोल मिस्त्री, वैभव आमकर यांनी सहभाग घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.