पूर्णगड शाळेत मुल्यवर्धन कार्यशाळा

पूर्णगड शाळेत मुल्यवर्धन कार्यशाळा
Published on: 

पूर्णगड शाळेत मूल्यवर्धन कार्यशाळा
पावस ः रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श शाळा पूर्णगड नं. १ येथे शिक्षण परिषद अंतर्गत मूल्यवर्धन प्रशिक्षण उजळणी कार्यशाळा उत्साहात झाली. ही कार्यशाळा केंद्रप्रमुख महेश तोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. या कार्यशाळेसाठी मूल्यवर्धन रत्नागिरी तालुका समन्वयक वैभव कांबळे उपस्थित होते. त्यांनी मूल्यवर्धन प्रशिक्षणाची गरज या विषयी मार्गदर्शन केले तसेच ‘एक झाड लावू’ हे कृतीयुक्त गीत सादर करून सर्वांची मने जिंकली. प्रमुख मार्गदर्शक म्हणून सावंत यांनी मूल्यवर्धन संदर्भातील सविस्तर माहिती दिली.
---

----
- rat१६p१९.jpg-
P26O70537
पावस ः तालुक्यातील कुर्धे गावातील लिंगातवाडी परिसरामध्ये वनराई बंधारा बांधताना ग्रामस्थ.

कुर्धे-लिंगायतवाडीत उभारला बंधारा
पावस ः यंदा पाऊस कमी असल्यामुळे सर्वत्र दुष्काळाची छाया पसरली असून, त्यावर मात करण्यासाठी वनराई बंधारे बांधणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन मेर्वी महसूल अधिकारी मीनाक्षी कदम यांनी केले. कुर्धे-लिंगायतवाडी परिसरामध्ये वनराई बंधारा बांधण्यात आला. या वेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी पंचायत समिती सदस्य स्वाती शिंदे, विजय शिंदे, संतोष शिंदे, संजय लिंगायत, सुधीर आंब्रे, आदिती गुरव, मंडळ अधिकारी रमाकांत भातडे, पोलिस पाटील वैभव शिंदे तसेच शालेय विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com