

-rat१६p४०.jpg-
P26O70605
रत्नागिरी : क्रीडा स्पर्धांमध्ये यश मिळवणारे पाली येथील मराठा मंदिर न्यू इंग्लिश स्कूलचे खेळाडू.
----
पाली न्यू इंग्लिश स्कूलचे
विविध क्रीडा स्पर्धेत यश
रत्नागिरी, ता. १७ : पाली येथील मराठा मंदिर न्यू इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी विविध शालेय क्रीडा यश संपादन केले. १९ वर्षाखालील भालाफेक स्पर्धेत हर्ष गावडे याने क्रमांक पटकावला. त्याची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.
तालुकास्तरीय भालाफेक स्पर्धेत निनाद सरफरे (द्वितीय), गोळाफेकमध्ये निनाद सरफरे (तृतीय), १०० मीटर धावणे, प्रसाद सुवारे (प्रथम), २०० मी. धावणे, प्रसाद सुवारे (प्रथम), तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत (१९ वर्षाखालील) प्रथम, १७ वर्षाखालील खो-खो स्पर्धेत द्वितीय, १४ वर्षाखालील खो-खो स्पर्धा (प्रथम), फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धेत (१७ वर्षाखालील) आर्यन मोहिते (तृतीय), अथर्व गराटे (तृतीय) याने यश मिळवले. जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत प्रसाद कोलते याने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. जिल्हास्तरीय फ्रीस्टाइल कुस्ती स्पर्धेत (४८ किलो), आर्यन मोहिते (प्रथम), दक्ष कांबळे (द्वितीय), ५५ किलो गटात अथर्व गराटे (प्रथम), सार्थक काजरेकर (द्वितीय), ६० किलो गटात वरद धाडवे (द्वितीय), धनराज पालकर (द्वितीय) यांनी यश मिळवले. या खेळाडूंना क्रीडाशिक्षक तुफिक पटेल, नीलेश पाटील, प्रा. संजय कांबळे, प्रा. अमोल यादव, प्रा. बनकर, चौगुले यांचे मार्गदर्शन लाभले.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.