

rat२p२.jpg-
O७३७१४
रत्नागिरी ः माउली फाउंडेशनतर्फे आयोजित दिव्यांगांसाठी मोफत जयपूर फूट नोंदणी शिबिरावेळी उपस्थित मान्यवर.
माउली फाउंडेशनकडून ६३ दिव्यांगांना कृत्रिम पाय
स्वावलंबी बनवण्यावर भर; चार आठवड्यानंतर वितरण
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ ः गरजू व दिव्यांग बांधवांना स्वावलंबी जीवन जगण्यासाठी आशेचा नवा किरण देण्याच्या उद्देशाने माउली फाउंडेशन, काळंबादेवी, मुंबई यांच्यावतीने मोफत जयपूर फूट (कृत्रिम पाय) शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी (ता. १) रत्नागिरी येथील शिबिरास ६३ दिव्यांग बांधवांनी नोंदणी केली.
मराठा मंदिर, अ. के. देसाई हायस्कूल येथे पार पडलेल्या या शिबिराचे उद्घाटन रत्नागिरीचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनोद जाधव, न्यायाधीश कपाडिया, रत्नागिरी जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. विलास पाटणे, माउली फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. एच. एस. शिंगण, कार्याध्यक्ष ॲड. विश्वनाथ टाळकुटे, संतोष गुजर आणि देसाई हायस्कूलच्या प्राचार्य अंजली पिळणकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. या प्रसंगी ज्येष्ठ वकील ॲड. भाई गवाणकर, ॲड. राकेश भाटकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
या शिबिरात सहभागी दिव्यांग बांधवांच्या कृत्रिम पाय (जयपूर फूट) व कॅलिपरसाठी आवश्यक प्राथमिक तपासणी आणि अचूक मोजमाप घेण्याची प्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत पार पडली. येत्या चार आठवड्यांच्या कालावधीत रत्नागिरीत पुन्हा विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून सर्व पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार विनामूल्य जयपूर फूट व कॅलिपरचे वाटप करण्यात येणार आहे. ‘माणुसकी जपूया, सेवेतून समाज घडवूया’ या ब्रीदवाक्याला अनुसरून भविष्यातही अशाच प्रकारचे विविध समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबवण्याचा संकल्प फाउंडेशनने व्यक्त केला. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी फाउंडेशनचे पदाधिकारी, समन्वयक, वैद्यकीय पथक, स्वयंसेवक, रत्नागिरी बार असोसिएशन आणि देसाई हायस्कूल प्रशासनाने विशेष परिश्रम घेतले.
-----------
चौकट १
कृत्रिम पायामुळे जगण्याची उमेद
"जयपूर फूटच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना पुन्हा स्वतःच्या पायावर उभे राहून चालण्याची क्षमता मिळते. केवळ भौतिक साधन न देता त्यांच्यात आत्मविश्वास आणि सन्मानाने जगण्याची उमेद निर्माण करणे हाच या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे," असे माउली फाउंडेशनतर्फे सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.